विशाल निकमची मालिकेमध्ये एंट्री !

“मानसिंग प्रत्येकाच्या मनात छाप सोडून जाईल...” 

0

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन तिसरा प्रचंड गाजला. या पर्वात विशाल निकम याने संपूर्ण महाराष्ट्राची मने पुन्हा एकदा जिंकली. प्रेक्षकांचे भरभरून प्रेम त्याला मिळाले. आणि तो या पर्वाचा महाविजेता ठरला. बिग बॉस मराठी संपल्यानंतर आता विशाल निकम कुठल्या कार्यक्रमात येणार ? कुठल्या भूमिकेत त्याला बघायला मिळणार ? याची सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती. आता प्रतीक्षा संपली असून विशाल लवकरच नव्या भूमिकेत आपल्याला भेटायला येणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील आई मायेचं कवच मालिकेमध्ये त्याची लवकरच एंट्री होणार आहे. मालिकेतील त्याचा लुक कसा असेल ? त्याचे काय पात्र असेल ? हे प्रेक्षकांना कळणार आहेच. विशाल मालिकेत मानसिंग नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आता हा मानसिंग नक्की कोण आहे ? त्याचा काय हेतु आहे ? हे अजून गुलदस्त्यात आहे. तेव्हा नक्की बघा आई मायेचं कवच सोम ते शनि रात्री १०.०० वा. कलर्स मराठीवर! विशाल निकम याबद्दल बोलताना म्हणाला, ‘बिग बॉस मराठीनंतर अॅक्टिंग पुन्हा एकदा सुरू होते आहे, त्याबद्दल आनंद आहे. बिग बॉस मराठी संपल्यानंतर ठरवलं होतं की प्रेक्षकांचे मनोरंजन करेन. आणि आज पहिले पाऊल उचलले आहे.

खूप मोठी जबाबदारी आहे. मानसिंग हे पात्र आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळे असे पात्र आहे. आव्हानात्मक आहे, मालिकेत उत्तम कलाकार आहेत आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे. कलर्स मराठीसोबत पुन्हा जोडला जातो आहे या गोष्टीचा आनंद आहे आणि खूप उत्सुक देखील आहे. मानसिंग प्रत्येकाच्या मनात छाप सोडून जाईल असाच प्रयत्न असेल माझा आणि तितकी मेहनत मी घेणार हे नक्कीच.”

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.