मतदानाच्या पार्श्वभूमीवर नोवा तर्फे “वोट कर, नाशिककर” मतदान जनजागृती अभियान

0

नाशिक,दि,१९ मे २०२४ – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अंतिम व पाचव्या टप्प्यातील नाशिक लोकसभा मतदार संघांमध्ये उद्या सोमवार, (दि २०) रोजी मतदान होणार असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या (नोवा) वतीने जनजागृती अभियान आज रविवार (दि.१९) रोजी संपुर्ण शहरात ठिक ठिकाणी, सिग्नलवर, चौक चौकात उभे राहून वोट कर, नाशिककर व जनजागृतीपर फलक लोकांना दाखवत घोषणा देत. मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

अभियानाची सुरुवात सकाळी ८ वाजता रविवार कारंजा येथील सिध्दी विनायक गणपतीच्या दर्शनाने करण्यात आली. यानंतर अशोक स्तंभ, मेहेर सिग्नल, सी बी एस, त्र्यंबक नाका, मुंबई नाका, सिटी सेंटर मॉल, ए बी बी सर्कल, जेहान सर्कल, गंगापुर नाका येथुन कॅनडा कॉर्नर येथे समारोप करण्यात आला.

यावेळी मतदान करा फरक पडतो, दिवस नाही सुट्टीचा आहे कर्तव्य पार पाडण्याचा, जना मनाची पुकार आहे मतदान आपला अधिकार आहे, वृध्द असो वा जवान नक्की करा मतदान, मतदान माझा अधिकार मतदान माझे कर्तव्य असे मतदान करण्यास प्रेरित करणारे घोषवाक्य लिहिलेले फलक घेवुन नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

यावेळी नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम, सरचिटणीस गणेश बोडके, सहचिटणीस रवी शिरसाठ, नंदन दीक्षित, सचिन गिते, नितीन धारणकर, विष्णुपंत पवार, गौरव माटे, दीपक पवार, मनिष नाशिककर, निखिल सुराणा, बंटी धनविजय, सोमनाथ पाटील, सुरेश सोळंके, हितेश यशवंते यांसह सर्व सभासद उपस्थित होते.

वोट कर,नाशिककर
वोट कर,नाशिककर या अभियाना अंतर्गत नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने चौक चौकात उभे राहून जनजागृती तर केलीच तसेच सभासदांकडून स्व:खर्चाने शहरातील मुख्य चौकांमध्ये जनजागृतीचे जाहिरात फलक देखील लावण्यात आले आहे. या माध्यमातून अधिकाधिक नाशिककरांनी आपला मतदानाचा हक्क बजावत. राज्यातून सर्वाधिक मतदान नाशिक जिल्ह्यातून व्हावे याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.