वरळीत मतदार यादीत मोठा घोळ; आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

राहुल गांधींनंतर आता आदित्य ठाकरेंनी पुरावे दिले, निवडणूक आयोगावर ' मत चोरी'चा आरोप

0

मुंबई, दि. २७ ऑक्टोबर २०२५ Voter List Scam वरळी विधानसभा मतदारसंघात तब्बल १९ हजार मतदार संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. ठाकरे यांनी आपल्या निर्धार मेळाव्यात सादर केलेल्या प्रेझेंटेशनद्वारे मतदार यादीतील घोळ, नावातील गोंधळ, आणि मृत व्यक्तींची नावे कायम असल्याच्या बाबी समोर आणल्या आहेत.

🔹मत चोरी म्हणजेच निवडणूक चोरी आदित्य ठाकरे (Voter List Scam)

राहुल गांधींप्रमाणेच आदित्य ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगावर (Election Commission) थेट निशाणा साधत म्हटलं की,

लोकसभेनंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार असं सर्वांना वाटत होतं, पण वोट चोरीमुळे सत्ता उलटली. आता ही लढाई ड्राफ्ट रोलपासून सुरू होईल. प्रत्येक कार्यकर्त्याने मतदार यादी वाचायला शिकले पाहिजे.”

🔹 वरळी मतदारसंघातील धक्कादायक आकडेवारी

आदित्य ठाकरे यांच्या मते,

वरळी मतदारसंघात १९ हजार संशयास्पद नावे,

विधानसभा निवडणुकीनंतर १२०० मतदार कमी,

११३ मतदार हे १०० वर्षांपेक्षा अधिक वयाचे असून, अनेक मृत आहेत,

४,१७७ मतदार असे आहेत ज्यांचा कोणताही पत्ता नोंदलेला नाही,

एकाघसीटाराम हलवाईदुकानाच्या पत्त्यावर अनेक मतदार दाखवले गेले, जे दुकान १० वर्षांपूर्वी पाडण्यात आलेले आहे.

🔹 फोटोंचा आणि भाषेचा घोळ

ठाकरे म्हणाले, “ईसीनेट हे सॉफ्टवेअर फोटोंतील चूक शोधतं, पण मुंबईतील अनेक मतदारांच्या फोटोंमध्येच घोळ आहे. काही फोटोंमध्ये चेहरा अस्पष्ट आहे, तर काहींचे फोटोच नाहीत. मग ओळख कशी होणार?”

त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला वरळीतील दोन मतदारांची नावं दक्षिण भारतीय भाषेत आहेत. मुंबईला कुठल्या दक्षिण राज्याची सीमा लागते का?” असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला केला.

🔹 घर क्रमांकपत्त्यांतील गडबड

अनेक नावांसमोर फक्तझो”, “?” किंवा “/” अशी चिन्हे असल्याचे ठाकरे यांनी निदर्शनास आणले. “एका घरात दहा-दहा मतदार दाखवले आहेत. २३४ घरांमध्ये ३,३३५ मतदार दाखवले गेलेत हे कसले नियोजन?” असा सवाल त्यांनी केला.

🔹 कार्यकर्त्यांसाठी पाच सूचनांद्वारे सावधगिरीचा इशारा

महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की

डुप्लिकेट मतदार शोधा.

मृत मतदारांची नावे शोधा.

फोटो नसलेले मतदार ओळखा.

पत्ता नसलेल्या मतदारांची यादी तयार करा.

एकाच पत्त्यावर अनेक मतदार असलेले नावे तपासा.

🔹 पुढची पायरी :ड्राफ्ट रोलतपासणी मोहीम

आता आगामी निवडणुकीपूर्वी शिवसेनेची विशेष तपासणी मोहीम सुरू होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.आपण प्रचारात वेळ घालवू, पण मतदार यादी तपासली नाही तर उपयोग नाही. मत चोरी थांबवली नाही तर लोकशाहीचा अर्थच नाही,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंच्या या आरोपांनंतर मुंबईच्या राजकीय वर्तुळात हलचल माजली आहे. निवडणूक आयोग यावर काय उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!