नाशिक,दि २३ एप्रिल २०२३ – मन सुदृढ व आरोग्य चांगले रहाण्यासाठी एखाद्या छंद, कलेत मन गुंतवावे असा सल्ला डॉक्टर्स नेहमीच देतात. त्यासाठी प्रशिक्षण घेतले तर उत्तम कलानिर्मिती करता येते. स्वतः आनंद मिळवून तो इतरांपर्यंत पोहोचवता येतो. याच उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएशन ( आयएमए ) नाशिक शाखेच्या महिला विभागातर्फे जगप्रसिद्ध वारली चित्रशेैली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत ही कार्यशाळा होईल.आयएमए हॉल, शालिमार येथे होणाऱ्या या कार्यशाळेत १० वर्षांवरील मुलीमुली व सगळ्या वयोगटातील स्त्रीपुरुष कलाप्रेमींना सशुल्क सहभागी होता येईल. वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर मार्गदर्शन करणार आहेत.
सहभागी सर्वांना आवश्यक साहित्य, मराठी – इंग्रजी नोट्स व सर्टिफिकेट देण्यात येईल. येतांना पेन्सिल, पाण्यासाठी बाउल, जुना रुमाल व पॅड आणावे. प्रवेशासाठी दि. २७ एप्रिल पर्यंत आयएमए कार्यालयात नावनोंदणी करावी. कार्यशाळेत जास्तीतजास्त सभासद व त्यांच्या कुटुंबियांनी सहभागी व्हावे असे आवाहन ३०अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ, सचिव डॉ.माधवी मुठाळ, प्रकल्प संयोजक डॉ. निकिता पाटील व समन्वयक डॉ. पूर्ती नेहते, डॉ. स्नेहल जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संजय देवधर ९४२२२७२७५५ व आयएमए २५०२७८७ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.