नाशिक शहरातील ‘या’ प्रभागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

0

नाशिक – गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथील गुरुत्व वाहिनीवरील ९०० मि.मि. व्हॉल दुरुस्ती कामासाठी शुक्रवार दि ११ फेब्रुवारी २०२२ रोजी शटडाऊन आवश्यक आहे. त्यामुळे मनपाचे गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथुन पाणी पुरवठा होणा-या नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र. २३ भागश: व ३० भागश: साईनाथ नगर, विनय नगर, अमृत वर्षा कॉलनी, वडाळा रोड, जयदीप नगर, मिल्लत नगर, जे एम सी टी कॉलेज परिसर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रहनुमा नगर, गणेश बाबा नगर, आदित्य नगर, कल्पतरू नगर, पखाल रोड, मातोश्री कॉलनी, ममतानगर, अशोका मार्ग हा परीसर

तसेच संपुर्ण नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. १७,१८,१९,२०, २१ व २२ मधील पाणीपुरवठा शुक्रवार दि.११ फेब्रुवारी २०२२ रोजीचा सकाळी ९ वाजेनंतर व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच शनीवार दि. १२ फेब्रुवारी २०२२ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.