संपूर्ण नाशिक शहरात शनिवारी २० ऑगस्टला पाणी पुरवठा बंद

0

नाशिक – एककीकडे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु आहे त्यामुळे गंगापूर धरण जवळपास ८२ टक्के भरले आहे .जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरलेली असतानाच नाशिककरांवर २ दिवस पाणी संकट ओढवणार आहे. शनिवारी ( दि. २०) रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जिल्ह्यातील गंगापूर आणि मुकणे धरणावर काही तांत्रिक कामे चालणार आहेत. या कामाचे स्वरूप मोठे आहे त्या कारणास्तव शनिवारी (दि. २०) ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद रहणार आहे. अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मनपाचे मुकणे धरण रॉ .वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथुन एक्सप्रेस फिडरवरून जॅकवेलसाठी ३३ के .व्ही . वीजपुरवठा कार्यान्वित आहे .या सब स्टेशनमधील दुरुस्ती करीता शनिवार दिनांक २०/०८/२०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजे पर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे तसेच मनपाचे गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथील दुरुस्ती कामे करणे आवश्यक असल्याने शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ .०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र येथून संपुर्ण नाशिक शहरास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही त्यामुळे सदर दोन्हीही ठिकाणांहून होणारा पूर्ण शहराचा पाणीपुरवठा दि . २०/०८/२०२२ रोजी बंद ठेऊन उपरोक्त नमूद कामे करता येणे शक्य होणार आहे . तरी मनपाचे गंगापूर धरण व मुकणे धरण रॉ .वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा शनिवार दि . २०/०८/२०२२ रोजीचा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच रविवार दि . २१/०८/२०२२ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल

त्यामुळे नाशिककरांना पाणी जपून वापरावे असे आवाहन देखील मनपा प्रशासनाने केले आहे. गंगापूर धरण आणि मुकणे धरणावरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर हा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत होईल अशी माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात २० आणि २१ ऑगस्ट असे दोन दिवस नाशिक शहरावर पाणीसंकट राहणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.