शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद

0

नाशिक – मनपाचे गंगापुर धरण रा. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील अ १३२ के. व्ही. सातपुर ब) १३२ के. व्ही. महिंद्रा या दोन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ के. व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे व मुकणे धरण रॉवॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथुन ३३ के.व्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदरचे केंद्रांवरील महावितरणकडुन ओव्हरहेड लाईन व सबस्टेशनची पावसाळापुर्व कामे पूर्ण करायची आहेत. त्यामुळे शनिवार दि.२१/०५/२०२२ रोजी सकाळी ०९.०० ते सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

तसेच नाशिक पश्चिम व पंचवटी विभागामार्फत जलशुध्दीकरण केंद्रांकडे जाणारी अशुध्द पाण्याची मुख्य गुरुत्व वाहिनी गोदावरी नदीच्या उजव्या व डाव्या बाजुला दुरुस्त करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन नाशिक सातपूर विभागामार्फत अशुध्द पाण्याची मुख्य गुरुत्ववाहीनी दुरुस्त करण्यात येणार आहे.

या दोन्हीही ठिकाणाहून होणारा पुर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवार दि. २१/०५/२०२२ रोजी बंद ठेवून ही कामे करता येणे शक्य होणार आहे. तरी मनपाचे मनपाचे गंगापुर धरण व मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा शनिवार दि.२१/०५/२०२२ रोजीचा दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच रविवार दि. २२/०५/२०२२ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नाशिक महानगरपालिके तर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!