मुंबई,दि.२ जुलै २०२३ –पक्ष,चिन्हासह राष्ट्रवादीने सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून देशातील आणि राज्यातील विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील नऊ वर्षात कारभार चालला आहे तसा चांगला प्रयत्न मोदी करत आहे. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून विकासाचा एकमेव मुद्दा समोर ठेवून आम्ही निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आम्ही मविआ सरकार शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतच देखील जाऊ शकतो, असे स्पष्ट करत अजित पवार यांनी आपल्या बंडाचे समर्थन केले आहे. तसेच मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. केवळ राज्याचा विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेण्यात आला. तसेच केंद्रातील सर्वाधिक निधी राज्याला कसा मिळेल. देशातील जनता सुखी कशी राहिल यासाठीच हा आम्ही निर्णय घेतला आहे. यापुढील सर्व निवडणूका या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच लढवू असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.