राज्यात पावसाचे कमबॅक होणार :’या’भागात बरसणार पाऊस;हवामानाचा अंदाज

0

मुंबई,दि.१४ ऑगस्ट २०२३ –जुलै महिन्यात पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली.मात्र ३१ जुलै नंतर पावसाने विश्रांती घेतली ती आजतागायत कायम आहे.हिमालयाच्या पायथ्याशी स्थिरावलेला मान्सून त्याच्या पुढील प्रवासासाठी च्या पोषक वातावरण अभावी ताटकळला. परिणामी राज्यातून पाऊस नाहिसा झाला. ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी दडी मारली पाऊस गायब झाल्याने बळीराजा चिंतेत आहे मात्र,आता पावसाचे पुन्हा राज्यात कमबॅक होणार आहे.

राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान आहे.तर काही ठिकाणी ऊन वाढले आहे. काही ठिकाणी अपुरा पाऊस झाल्याने बळीराजा चिंतेत असून पाऊस कधी होणार या आशेत बळीराजा असतांना हवामान विभागाने महत्वाची अपडेट दिली आहे.गायब झालेल्या पावसाचे १८ ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात  पुनरागमन होणार आहे. हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी या बाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

मान्सून काहीसा उशिरानं महाराष्ट्रात दाखल झाला.किंबहुना दाखल होऊनही मान्सूननं संपूर्ण राज्याचा ताबा घ्यायलाही बराच वेळ लावला. जुलै महिन्यात त्याचा वेग वाढला आणि पाहता पाहता तो महिना पावसानं खऱ्या अर्थानं गाजवला.राज्यात मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर आणि नांदेड याच जिल्ह्यात पवसाने दमदार हजेरी लावली. असं असतानाच ऑगस्ट मात्र यासाठी अपवाद ठरतोय. कारण, ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच राज्यात मान्सून बेताचा असल्याचं पाहायला मिळत आहे. बहुतांश भागात उन्हाळ्यात जाणवतो तसा उष्णचतेचा दाहसुद्धा जाणवू लागला आहे.पण,आता मात्र हे चित्र बदलेल. कारण, महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं स्पष्ट होत आहे.

पुढील २४ तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.तर,बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.काही भागांमध्ये दमट वातारणामुळं उष्णतेचा दाह अधिक जाणवेल.पण,ठाणे,रत्नागिरी,रायगडसह पालघरमध्येही हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे.सातारा,कोल्हापूर,पुणे पट्ट्यामध्ये बहुतांशी वातावरण ढगाळ राहणार असून,मधूनच पावसाची सर बरसण्याचा अंदाज आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.