महाराष्ट्रात पुढील ३ दिवस पावसाचे : शेती पिकांना मिळाली नवसंजीवनी

0

मुंबई,दि. ८ सप्टेंबर २०२३ –दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन झाल्याने गोविंदा पथकासह राज्यातील शेतकरी सुखावले आहे.नाशिक,पुणे मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक वरुणराजाने हजेरी लावली आहे. ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबरमध्ये वरूणराजा बरसायला सुरूवात झालीय, पुढील ३ दिवस राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.दरम्यान काल रात्रीपासून नाशिकमध्ये १५.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, ओडिशा आणि छत्तीसगड येथे असलेली चक्रिय वात स्थिती, पूर्व-पश्चिम कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रावरून येणारे वारे आणि मान्सूनचा आस मूळ स्थितीपासून दक्षिणेकडे सरकल्याने राज्याला फायदा होत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात आगामी काळामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर कोकण विभागात, उत्तर महाराष्ट्रात तसेच विदर्भामध्ये ९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. तर मराठवाड्यात शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी येथे सोमवार ११ सप्टेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात रविवारनंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल असा अंदाज आहे.

शुक्रवारी सकाळीही पावसाची संततधार सुरू राहिल्याने उकाडा कमी झाला असून शेती पिकांनाही नवसंजीवनी मिळाली आहे.राज्याच्या सर्वच भागात आज पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात उत्तर कोकण, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भासह गोव्याचाही समावेश आहे. तसेच मुंबईसाठी आज आणि उद्या ग्रीन तर, रविवारी यलो अलर्ट देण्यात आलाय. या दिवसी वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.