राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट ! विदर्भात यलो अलर्ट

0

मुंबई,दि. ११ फेब्रुवारी २०२४ – देशातील वातावरणात सातत्याने बदल होत असून महाराष्ट्रासह अनेक राज्यातही अचानक हुडहुडी जाणवायला लागली असून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

देशात उत्तरे काडील काही ठिकाणी बर्फाची चादर पसरली आहे.तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविण्यात आला आहे. त्यासोबत जळगाव, पुणे, सांगली आणि सोलापुरातही पावसाच्या सरीचा अंदाज आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत असून हातातोंडाशी आलेल्या पिकाकडे तो डोळे लावून बसला आहे. तर काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी मध्ये शनिवारी गारपीट झाली.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,बीड,नांदेड आणि लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर जालना, हिंगोली आणि परभणी वादळी वाऱ्यांसह हलका आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.