शिवसेना सोडण्याआधी बाळासाहेब काय म्हणाले, राज ठाकरे यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग
माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो : राज ठाकरे
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत.काही महिन्यापूर्वी राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे राज ठाकरे यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती.अखेर राज ठाकरे यांनी आज मंगळवारी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठाकरी शैलीत भाषण ठोकले.मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. शिवसेना सोडण्याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काय म्हटले, याची आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.
राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडावर भाष्य करताना छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्या बंडासोबत माझ्या त्या निर्णयाशी तुलना करू नका असे ठणकावून सांगितले. छगन भुजबळ, नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत दुसऱ्या पक्षात सामिल झाले. मात्र, मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून मी बाहेर पडलो असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा प्रसंग राज ठाकरे यांनी सांगितला. बाळासाहेब ठाकरे यांना कळलं होतं की मी आता शिवसेनेत राहणार नाही. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसोबतच्या शेवटच्या भेटीचा प्रसंग सांगितला. शिवसेना सोडण्याआधी मला त्यांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं. मनोहर जोशी यांच्यासोबत त्यांची बैठक संपल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले. खोली गेल्यानंतर त्यांनी मला मिठी मारली मी त्यांच्यापाशी गेलो तेव्हा त्यांनी मला प्रेमाने आलिंगन दिले आणि नंतर ‘आता जा’ म्हणून म्हटले, असे राज यांनी सांगितले. मी पक्ष सोडतोय हे त्यांना कळलं होतं. मी दगाफटका करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलो नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. तुम्हा कार्यकर्त्यांच्या बळावर नवीन पक्ष स्थापन केला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला त्यांच्या शस्त्रक्रियेचे काही किस्से सांगितले. आपला ट्रेडमार्क सेन्स ऑफ ह्युमर वापरून राज ठाकरे यांनी हे किस्से नेहमीप्रमाणे रंगवून सांगितले. हे सगळे किस्से ऐकताना सभागृहात चांगलाच हशा पिकला.
ते पुढे म्हणाले मनसे हा पक्ष आंदोलन अर्धवट सोडतो असा प्रचार विरोधक करतात . त्यांनी एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं. टोलचं आंदोलन. ६५ ते ६७ टोल आपल्या आंदोलनाने बंद केले. माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ते मुंबईत बोलत होते. टोलवरून त्यांनी महाविकास आघाडीसह भाजपावर टीका केली.सेना भाजपाच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं, टोलमुक्त महाराष्ट्र करू. त्यांना कोणी प्रश्न विचारला नाही. तुमच्याबद्दल खोटा प्रचार करणार. मला वाटतं या गोष्टी तुम्हाला जिल्हा तालुक्यात शहरात बोलतता तेव्हा तुम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही एवढे टोल बंद केले.असे हि ते म्हणाले.
मला वाटते काही गोष्टी तुमच्याकडून लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. आपल्याला रोखण्यासाठी अनेक माध्यमे अनेक राजकीय पक्ष जाणून बुजून काही गोष्टींचा प्रचार करत असतात. तुम्ही सक्षम आहात, असे राज ठाकरे म्हणाले. टोलवरून त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर टीका केली. आपला पहिला मुद्दा होता तो हा की टोल. जगभरात टोल. टोलवर पैसा गोळा करतो. त्यातून ब्रिज आणि रस्त्याची रक्कम गोळा करतात. आपला प्रश्न होता हे टोल किती वर्ष राहणार आणि किती पैसे गोळा होतात. ती कुणाकडे जातो. ही कॅश रोज कुणाकडे जाते. त्याचं पुढे होतं काय. याची कोणतीही उत्तरं आजपर्यंत सरकारकडून दिली गेली नाही, असा ही आरोप त्यांनी केला.
अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचंय. असा शब्द अमित शाह यांनी दिला होता. पण भाजपने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आम्ही युती तोडली, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार म्हणतात. मग “पंतप्रधान मोदी जेव्हा भाषण करायचे. त्या मंचावर उद्धव ठाकरे बसलेले. मोदी जाहीर भाषणात सांगतात. सत्ता येईल आणि देवेद्र फडणवीस होईल. शहा भाषणात सांगतात. फडणवीस मुख्यमंत्री होईल. तेव्हाच आक्षेप का घेतला नाही. त्यावेळीच त्यांना फोन का केला नाही. सर्व निकाल लागल्यावर तुम्हाला आठवलं. याचं कारण या सर्व गोष्टींची बोलणी आधी पासून सुरु असणार. लोकांनी मतदान कुणाला केलं होतं. दोन्हीकडच्या मतदारांना काय वाटलं असेल. सेना भाजप नको म्हणून मतदान केलं तुम्ही त्यांच्यासोबत गेला. भाजप सेनेच्या मतदारांना वाटत असेल दोन्ही काँग्रेस नको म्हणून तुम्हाला मतदान केलं. ते नकोत म्हणून मतदान केलं आणि तुम्ही त्यांच्यासोबत जाता. ही हिंमत होते कशी. जेव्हा लोकं शासन करत नाही. शिक्षा करत नाही. तेव्हाच ही हिंमत होते. आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. तुम्ही आमच्या मतांची किमत केली नाही”,असंही राज ठाकरे म्हणालेत.
ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे. तर २०१९ ला तुम्ही मागणी करूच कशी शकता. कमी आमदार आल्यावर. म्हणे कमिटमेंट केली. चार भिंतीत कमिटमेंट घेतली. माणसे दोनच. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे ठरलेलंच आहे तर तुम्ही मुख्यमंत्रीपद मागताच कसं?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
सोशल मीडियात फेसबुकवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्या तर त्याला एक क्षणही पक्षात ठेवणार नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. पक्षातील वाद सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांचे राज ठाकरे यांनी यावेळी चांगलेच कान उघाडणी केली. ते म्हणाले की, ‘पदाधिकाऱ्याने पदाधिकाऱ्याने पक्षातल्या पक्षात व्हाट्सअप सोशल मीडियात फेसबुकवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्या तर त्याला एकक्षणही पक्षात ठेवणार नाही हे लक्षात ठेवा. तुमचे चोचले खूप पुरवले. झालं तेवढं खूप झालं. तुमचं काम सांगायचं असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा. जर उणीदुणी काढत असाल तर काढून तर बघा. कुणी जर काढलं असेल तर माझ्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, असा दमच राज ठाकरे यांनी यावेळी मनसेच्या पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिला आहे.