(हरिअनंत,नाशिक)ज्या आठ राशी विषयी आपण गेल्या चार भागापासून चर्चा करतोय, त्या आठ राशीतील तुळ राशी विषयी सविस्तर चर्चा आपण केली. तुळ राशीचा शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुळ राशीचे व्यक्ती मोठे कर्ज घेण्याचा विचार करीत असतील, तर कर्ज घेण्यापूर्वी, मोठा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी आपल्या जन्मपत्रिकेचे परीक्षण करून घ्यावे. याचे महत्वाचे कारण म्हणजे- तुळ व मिथुन राशीवर शनीचा ढय्या सुरू आहे. शनीच्या या ढय्यात व्यक्ती कितीही बुद्धिमान,चतुर व व्यवहार- कुशल असेल, तरी त्यांच्याकडून भावनेच्या आहारी गेल्यामुळे घेतलेला निर्णय चुकतो आणि होऊ नये ती नुकसान होते. निष्कारण नुकसान होऊ नये म्हणून जन्मपत्रिकेचे परीक्षण करून घ्यावे. अर्थात- जन्मपत्रिकेतिलअसलेल्या नवग्रहात शनी हे न्यायदेवता आहे.
शनी न्यायाविषयी अतीशय शिस्तप्रिय आहे. यापूर्वी मी अनेकदा म्हणालोय शनी जाणीवपूर्वक कुणावरही अन्याय करीत नाही आणि अन्याय करणाऱ्याला दंड दिल्याशिवाय सोडीत नाही. शनी हा जन्मपत्रिकेतील बाराराशिवर कार्य करीत असतो.अर्थात शनीचा संबंध हा केवळ साडेसातीपुरता मर्यादीत नाही, तर शनीचा ढईय्या,साडेसाती, अंतर्दशा, महादशा, प्रत्यांतरदशा, सूक्ष्मदशा अशा विविध मार्ग शनी कार्यरत असतो.
शनी या विश्वाचा न्यायाधीश आहे. ‘एस’ नावाच्या आद्याक्षराने प्रारंभ होणारी प्रत्येक गोष्ट ही शनीच्या छायेत कार्यरत असते. उदा..संसार सुख, संतान,सौख्य अशा अनेकानेक गोष्टींचा प्रमुख हा शनी आहे. हाती घेतलेल सर्वकाही संपूर्ण होण्यासाठी आपले जे प्रयत्न असतात ते सर्वकाही संपूर्णतेवर शनीचा वरदहस्त हवा असतो. विश्वात व्यक्ती जो श्वास घेतात त्या श्वासावर शनीचा अमल असतो. आत्ता, वर्तमान स्थितीत शनी वक्री आहे.अर्थात शनीचे वक्री असणे योग्य नाही. या कारणास्तव बाराराशींच्या प्रत्येक व्यक्तीने सावधान राहणे महत्वाचे आहे.
जे नवग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहाची आप- आपली महिमा आहे,पण शनीचा महिमा हा बारा राशीं बरोबर निगडित आहे. या विश्वात असा एकही व्यक्ती, प्राणी पशु- पक्षी नाही की शनीचा त्याच्याशी संबंध नाही, प्रत्येकाचा आणि प्रत्येकाशी प्रत्येकाच्या जन्मापासून-मृत्यूपर्यंत शनीचा अतूट संबंध असतो आणि नेमकी हिच गोष्ट आपण विसरतो. विसरतो म्हणण्यापेक्षा दुर्लक्ष करतो. या दुर्लक्षपणाचा परिणाम प्रत्येकाला भोगावा लागतो.
मिथुन आणि तुळ राशीवर शनीचा ढईय्या १७ जानेवारी २०२३ पर्यन्त आहे कुंभ राशीतून शनीने मकर राशीत १७ जानेवारी २०२३ पर्यन्त राहणार . धनु, मकर आणि कुंभ राशीवर साडेसातीचा प्रभाव असूनही या राशीना शनी उत्तम फल देणार केवळ ८ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर पर्यन्त या राशीच्या व्यक्तींनी अतिशय (क्रमशः) भाग -१६६
साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत