काय असले दीपा कार्तिकच्या मुलींचं नाव ?

0

मुंबई – स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेत या भागात दीपा आणि कार्तिकच्या मुलींचा नामकरण सोहळा पाहायला मिळणार आहे. दीपाने जुळ्या मुलींना जन्म दिला असला तरी दोन्ही मुली दोन वेगळ्या घरात वाढत आहेत. कार्तिकने मुलींचं पितृत्व नाकारल्यामुळे दीपाने एकटीने मुलीला वाढण्याचा निर्धार केला आहे. तर दीपाची खूण म्हणून सौंदर्याने दीपाची एक मुलगी आपल्या घरी वाढवण्याचं ठरवलं आहे.

दोन्ही मुली जरी वेगवेगळ्या घरात वाढत असल्या तरी योगायोगाने दोघींचा बारसा मात्र एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी होणार आहे.

Naming ceremony of Deepa-Karthik's daughters to be Rang majha vegala series
देवावर श्रद्धा असणाऱ्या दीपाने आपल्या लेकीचा बारसा मंदिरात करायचं ठरवलं आहे. तर सौंदर्या इनामदारनेही कोणताही बडेजाव न करता मंदिरातच बारसा करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मुलींचं नावही ठरवण्यात आलं आहे. दीपा आणि कार्तिकच्या नावावरुनच दीपिका आणि कार्तिकी असं नाव ठरवण्यात आलं आहे. आता या दोन लेकी दुरावलेल्या दीपा-कार्तिकला पुन्हा एकत्र आणणार का हे पहाणं उत्सुकतेचं असेल. ३० ऑगस्टच्या विशेष भागात हा नामकरण सोहळा पाहायला मिळणार आहे. रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.
WhatsApp Group