तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेत मोठयाबाई काय भूमिका घेणार !

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ,मन झालं बाजींद, आणि देवमाणूस २ मालिकांमध्ये विलक्षण वळण : रविवारी पहा आवडत्या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग

0

मुंबई – झी मराठीवरील मालिका या प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत असतात, त्यामुळे प्रेक्षकांना आता सोमवार ते शनिवारच नाही तर येत्या रविवारी देखील त्यांच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड पाहायला मिळतील. मन झालं बाजींद, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तसंच देवमाणूस २ या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग येत्या रविवारी प्रेक्षकांसाठी झी मराठी सादर करणार आहे.

रायाबरोबर ठरलेलं लग्न मोडल्यामुळे अंतरा आपल्या आई-वडीलांसहित गुली मावशीला सामील करून घेत नाटक करते. गुली मावशी ऋतिकचं अंतराबरोबर लग्न लावण्याचा निर्णय घेते. त्यामुळे सुरुवातीला सगळ्यांना धक्का बसतो पण नंतर सगळे स्वीकारतात. लग्न असल्यामुळे घरात देवीचा गोंधळ घातला जातो. त्याचवेळी देवीकडून घरची लक्ष्मी रुसणार असा संकेत मिळतो आणि शेवटी कृष्णाला विधातेंच्या घरात बळी देण्यासाठी आणलं होतं, हे कळतं. आता कृष्णाची त्यावर काय प्रतिक्रिया असेल? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका मन झालं बाजींदचा एक तासाचा विशेष भाग रविवार २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता.

मोठ्याबाईंना चक्कर आल्याचा, धक्का बसल्याचा संपुर्ण दोष सिड व देशमुख कुटुंबातील बायका अदितीला देतात. सिड अदितीला तू खोटं बोल्लीस असं सांग मोठ्याबाईला सांगायला सांगतो. अदिती सारं स्वतःवर घ्यायला तयार होते आणि त्यासाठी मुद्दाम घरातल्यांनी तिचा तिरस्कार करावा अशी वागू लागते. त्यामुळे देशमुख कुटुंबातील बायका अदितीला घराबाहेर काढणार इतक्यात मोठयाबाई ठाम भूमिका घेतात. त्यांची भूमिका काय असेल हे प्रेक्षकांना रविवारी रात्री ९ वाजता पाहायला मिळेल.

नीलमचा मर्डर झाल्यामुळे अजित पूर्णपणे गोंधळात आहे. डिम्पल अजितला पोलिसांच्या जाळ्यात अडकवते. जयसिंग बायकोला शोधतोय आणि अजितच्या रूममध्ये पोलीस दारू प्यायला बसले आहेत त्यामुळे अजित पूर्णपणे अडकला आहे. नीलमची बॉडी बाहेर घेऊन जाताना पोलीस पकडतील याची त्याला भीती आहे. इतक्यात डिम्पल अजितला तिची माफी मागून तिला पार्टनर करून घ्यायची मागणी करते. अजित डिम्पलची मागणी पूर्ण करेल का? याचं उत्तर प्रेक्षकांना रविवारी रात्री १० वाजता मिळेल.आपल्या आवडत्या मालिकांचे १ तासांचे विशेष भाग रविवार २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजल्यापासून झी मराठीवर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.