नवी दिल्ली,,दि,१२ एप्रिल २०२५ – शनिवारी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना व्हाट्सअप सुविधा वापरण्यात अनेक अडचणीचा सामना करावा लागला. भारतातील वापरकर्ते संदेश पाठविण्यास आणि स्टेटस अपलोड करण्यात अनेक तास अडचणींचा सामना करावा लागला. मात्र आता पुन्हा व्हाट्सअप सुरु झाल्याने नेटकाऱ्यानी आनंद व्यक्त केला.
WhatsApp down in India, users unable to send messages
Read @ANI Story | https://t.co/fRBz4V5eWl#WhatsApp #India #outage pic.twitter.com/zOK31vTQGf
— ANI Digital (@ani_digital) April 12, 2025
मार्क झुकरबर्ग यांच्या मालकीच्या मेटा कंपनीने व्हॉट्सप खरेदी केली आहे. दरम्यान, आज सायंकाळी काही युजर्संना मेसेज पाठविण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी अडचण येत होती. त्यामुळे, डाऊनडिटेक्टरवरही अनेक व्हॉट्सअप युजर्संने व्हॉट्सअप डाऊन झाल्यासंदर्भात तक्रारी केल आहेत. व्हॉट्सअप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा मिम्स आणि मजेशीर विनोद शेअर होताना दिसून येत आहेत. तसेच व्हॉट्सअप डाऊन झाल्याची माहिती देखील अनेकांनी ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.
व्हाट्सअप कडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
एक्स वर, एक युरर म्हणाला की , मी स्थिती अपलोड करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तसे करण्यास बराच वेळ लागत आहे. याबद्दल व्हॉट्सअॅपकडून तात्काळ कोणतेही विधान आलेले नाही. काही वापरकर्त्यांनी मेटाच्या मालकीच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही अशाच प्रकारची समस्या आल्याचे बोलले जात आहे. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास व्हॉट्सअॅपमध्ये अडचण आल्याने नेटीझन्स युजर्सं (Netizens) काही काळ गोंधळल्याचं दिसून आलं. त्यामुळे, नेटीझन्स ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देत आहेत.