मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडलेल्या “हो पाइपलाईन तुटायची नाय” या साप्ताहिक कार्यामध्ये स्नेहा कॅप्टन्सीच्या कार्यासाठीची पहिली उमेदवार ठरली. अजून कोणता सदस्य उमेदवार असेल ? टास्क करा पार पडला जाईल ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल नक्की कोणते सदस्य शिक्षेस पात्र आहेत.
बिग बॉस यांनी जाहीर केले, घरातील काही सदस्य कार्य अनिर्णित कसे ठेवले जाईल या प्रयत्नात दिसले. परिणामी दोषी सदस्यांचे वास्तव्य जेलमध्ये असेल. कोणी आणले कार्यामध्ये विघ्न ? कोणात्या सदस्यांना मिळणार कारागृहाची शिक्षा ?
बिग बॉसने दिली गायत्रीला एक विशेष सूचना !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्कमध्ये सदस्य भान हरपून खेळतात. त्यामध्ये आपल्याला किंवा आपल्यामुळे दुसर्याला दुखापत तर होत नाहीना याची काळजी घ्यायचा त्यांना विसर पडतो. तरी टास्क दरम्यान बिग बॉस वारंवार सूचना देत असतात एकेमकांना इजा होईल असे काही करू नका… आज बिग बॉस गायत्रीला एक विशेष सूचना देणार आहेत.
बिग बॉस यांनी गायत्रीला सांगितले, आजचे कार्य पार पाडताना आपल्याला दुखापत झाली. तसेच पुढील किमान तीन आठवडे आपल्याला स्लिंग घालायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. याचसोबत टास्क खेळण्यासाठी देखील मनाई केली आहे. आता आपल्याला त्वरित आराम मिळणे जास्त आवश्यक आहे. असे बिग बॉस यांनी गायत्रीला सांगितले. बघूया पुढे काय होते.
बॉस मराठी सिझन तिसरा दररोक रात्री ९.३० वा.कलर्स मराठीवर.