१५ ऑगस्टला कोणता मंत्री कुठे ध्वजारोहण करणार : यादी जाहीर

0

मुंबई – ३० जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची शपथ घेतली,यानंतर ३९ दिवसांनी ९ ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारामध्ये भाजपचे ९ आणि शिंदे गटाच्या ९ अशा एकूण १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजूनही खातेवाटप झालेलं नाही आणि अद्याप जिल्ह्यांना पालकमंत्री कोण हे जाहीर झाले नाही.स्वातंत्र्यदिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केले जाते.मात्र मंत्र्यांना अद्याप जिल्ह्यांचे वाटप झाले नसल्याने कोणता मंत्री १५ ऑगस्टच्या दिवशी कोठे जाणार, याची उत्सुकता होती.अखेर कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आता सरकारने ३५ जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करेल, याची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या ३५ जिल्ह्यांपैकी १९ जिल्ह्यांमध्ये शपथ घेतलेले मंत्री १५ ऑगस्टला ध्वजारोहण करतील, याशिवाय उरलेल्या जिल्ह्यांमध्ये तेथील जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.आता जे मंत्री ध्वजारोहणासाठी येतील तेच पालकमंत्री त्या जिल्ह्याचे राहतील का, याची उत्सुकता आहे.

कोणते मंत्री कोठे ध्वजारोहण करणार याची यादी
देवेंद्र फडणवीस- नागपूर
सुधीर मुनगंटिवार-चंद्रपूर
चंद्रकांत पाटील-पुणे
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील- जळगाव
रवींद्र चव्हाण-ठाणे
मंगलप्रभात लोढा-मुंबई उपनगर
दीपक केसरकर-सिंधुदुर्ग
उदय सामंत-रत्नागिरी
अतुल सावे-परभणी
संदिपान भुमरे-औरंगाबाद
सुरेश खाडे-सांगली
विजयकुमार गावित-नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई- सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ

अमरावती येथे विभागीय आयुक्त कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!