संजय राऊतांच्या अडचणी पुन्हा वाढणार ?: राऊतांविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

0

नाशिक,२० फेब्रुवारी २०२३ – मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमित शाहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती.याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेनेतील बंडानंतर संपूर्ण राज्याच्याच राजकारणाला कलाटणी मिळाली. सध्या संपूर्ण राज्यभरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळतोय. अशातच नशिकमध्येही ठाकरे आणि शिंदे गट यातील संघर्ष वाढला आहे.शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातून शिंदें गटात गेलेले शिवसैनिक योगेश बेलदार यांनी संजय राऊतांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. भादंविच्या कलम ५०० अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आता राऊत यांच्यावर काय पुढील कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत जहरी टिका केली होती. यालाच प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांचा समाचार घेतला. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांविरोधात अपशब्द वापरले होते. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्यावर दाखल करण्यात आलेला हा पहिला गुन्हा आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.