World cup 2023: भारताची विश्वचषकात विजयी सलामी:ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय

0

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ च्या टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात विजयाचा श्रीगणेशा झाला आहे.  के एल राहुलची व विराट कोहलीची अर्धशतकी खेळी व सर्वच गोलंदाजांची जबरदस्त गोलंदाजी याच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला.

भारतीय संघाने शानदार खेळ करत ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २०० धावांचे लक्ष्य दिले होते. जे टीम इंडियाने अगदी सहज साध्य केले. केएल राहुल आणि विराट कोहलीने मोठी खेळी केली. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. ऑस्ट्रेलियाला लवकर आऊट करण्यात फिरकीपटूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.

भारताने विजय संपादन केला
२०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात इशान किशन शून्यावर बाद झाला. विश्वचषकातील त्याचा हा पदार्पणाचा सामना होता. यानंतर दुसरे षटक जोश हेझलवूडने टाकले. या षटकात त्याने रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि टीम इंडियाने 4 धावांतच 3 विकेट गमावल्या. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत अडकल्याचे दिसून आले.

पण यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने टीम इंडियासाठी 165 धावांची भागीदारी केली. या दोघांमुळेच टीम इंडिया सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. कोहलीने ८५ धावा केल्या. मात्र त्याचे शतक हुकले. राहुलने ९७ धावा केल्या. या दोघांनी विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी केली आहे.

सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी नक्कीच प्रभावित केले, परंतु एकदा विराट कोहली आणि केएल राहुल स्थिरावल्या नंतर सामना ऑस्ट्रेलियापासून दूर गेला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर मिचेल स्टार्कने १ विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियन संघ १९९ धावांवर सर्वबाद झाला
ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. जेव्हा मिचेल मार्श खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोन्ही खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. वॉर्नर ४१ धावा करून बाद झाला तर स्मिथ 46 धावा करून बाद झाला. मार्नस लॅबुशेनने २७ धावांचे योगदान दिले. शेवटी मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने काही मोठे फटके मारले. स्टार्कने १५ आणि कमिन्सने २८ धावा केल्या. पण संपूर्ण संघ ४९.३ षटकांत १९९ धावांत ऑलआऊट झाला.आणि अशा प्रकारे भारताला विजयासाठी २०० धावांचे लक्ष्य मिळाले

गोलंदाजांनी चमत्कार केला
भारतासाठी फिरकीपटूंनी शानदार खेळ केला. भारतीय फिरकीपटूंसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची एकही चाल यशस्वी ठरली नाही. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याने १० षटकात केवळ 2२८ धावा दिल्या. त्यांच्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी २-२ बळी घेतले. मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन अश्विन यांच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट गेली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.