World Photography Day : नाशिक छायाचित्रकार संघटनेचा अभिनव उपक्रम 

0

नाशिक – आज १९ ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त नाशिक छायाचित्रकार संघटना आयोजित  संघटनेच्या छायाचित्रकारांची मिसळ पार्टी व संगित मैफल चे आयोजन ग्रिन लॅण्ड रिसोर्ट मखमलाबाद रोड येथे करण्यात आले होते. नाशिक छायाचित्रकार संघटना हि नेहमीच आपल्या छायाचित्रकार बांधवानसाठी सामाजिक कार्य करत असते या भावनेतून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष संजय जगताप यांच्या संकल्पनेतून  करण्यात आले होते यावेळी छायाचित्रकांरानी मिसळ पार्टी सह संगित मैफल चा निसर्ग रम्य वातावरणात आनंद लुटला

यावेळी नाशिक छायाचित्रकार संघटना आयोजित पुढिल प्रि- वेंडिग वर्कशॉप व शैक्षणिक ट्रिप यावर चर्चा व नियोजन करण्यात आले. यावेळी संघटनेने दिलेले टि – शर्ट परिधान करून सर्व छायाचित्रकार उपस्थित होते एकमेंकाना फुल गुच्छ देऊन सर्वांनी यावेळी कॅमेराचे पुजन केले मंचावर संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप कमिटी मेंबर पंकज अहिरराव , प्रताप पाटील, प्रशांत तांबट, राज चौधरी, किरण मुर्तडक, धनराज पाटिल, योगेश चव्हाण, अमर तांबे ,गिरीश भोळे ,कैलास निरगुडे, अदि उपस्थित होते तर सूत्रसंचालन नंदु विसपुते यांनी तर आभार प्रदर्शन रवि सुर्यवंशी यांनी मानले, विलास आहिरे, संजय गाडे, शेख एजाज, दिलीप येलमामे यांच्या गाण्याने संगित मैफल आधिकच रंगतदार झाली कार्यक्रम यशस्वी ते साठी छायाचित्रकार – सौरभ अमृतकर, संदिप भालेराव. सुनिल जगताप, रविंद्र गवारे अदि ने परिश्रम घेतले.

World Photography Day  An innovative initiative of Nashik Photographers Association

या प्रसंगी जेष्ठ छायाचित्रकार  प्रकाश नाशिककर .अजित सारंग. नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, यांच्या हस्ते कॅमेरा पुजन करून तसेच दिवंगत छायाचित्रकारांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!