नाशिक- नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशशेठ थोरात यांच्या उपस्थितीत व प्रमुख पाहुणे सुप्रसिध्द सराफी व्यावसायिक बबनशेठ(नाना)दुसाने, रविंद्रशेठ जाधव व जेष्ठ रंगकर्मी श्री.विकास पालखेडकर मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन व नटराज व संहिता पूजन करून जागतिक रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष प्रकाशशेठ थोरात यांनी आपल्या जीवनात जागतिक रंगभूमी दिनाचे महत्त्व व नाटक मनोरंजन बरोबर व्यक्तींना शिक्षित आणि प्रेरणा देण्याचे कला आहे असे सांगितले.यावेळी जेष्ठ रंगकर्मी विकास पालखेडकर यांनी सांगितले की नाटक ही जिवंत कला आहे, नाटक करतांना प्रत्येक कलाकार हा वेगवेगळ्या प्रकारचे आयुष्य जगत असतो स्वताचे दुःख लपवुन रसिक प्रेक्षकांचे मन जिंकत असतो,नाटक करतांना सातत्य, प्रामाणिक राहुन रंगभूमीची सेवा करीत रहावे असे उपस्थित कलाकारांना अनमोल असे मार्ग-दर्शन केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना नाट्य कलावंत योगेश्वर थोरात यांनी सांगितले की जागतिक रंगभूमी दिन हा एक महत्त्वाचा उत्सव आहे कारण तो आपल्या जीवनात रंगभूमीचे महत्व अधोरेखित करतो, रंगभूमी कलाकारांना एक सर्जनशील व्यासपीठ प्रदान करते.
यावेळी राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलेल्या धर्ममाया नाटकातील कलावंत श्री.अविनाश वाघ, भगतसिंग परदेशी,मनोज जानोरकर,भारत इलेंजे, वैभव वाघ ,ओम जाधव,अमोल अहिरराव, उज्वला पाटील, समिक्षा कापडणे, मिनाक्षी परदेशी, जॅकी ठाकरे, निलिमा कुलकर्णी, सुमेध इटनारे,रोहन वाघ, जयप्रकाश पुरोहित आदी कलाकाराचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सुञसंचालन सौ.संगिता सोनार यांनी केले,प्रास्ताविक श्री शशिकांतशेठ अहिरराव , श्री संतोष शेठ सोनार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमास जेष्ठ सभासद श्री.सुधाकरराव विसपुते, अनंता ओझरकर, शामराव बिरारी, योगेश शेठ दुसानीस, बाळासाहेब खरोटे,जयंत ओझरकर, सुरेशशेठ बागुल,अशोकशेठ विभांडिक, प्रकाश शेठ वडनेरे, गणेश शेठ विखनकर, सौ, किर्ती थोरात,सौ.योगिता दुसानीस,सौ.वृंदा जाधव,सौ.पुनम वानखेडे ,सौ. वर्षा दंडगव्हाळ, सौ.अर्चना इंदोरकर,सौ.संगिता बागुल आदी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण दुसाने, चारुशेठ घोडके, प्रसन्ना इंदोरकर,शामशेठ सोनार, सुनील बाविस्कर,महेश घोडके,संदिप शेठ सोनार आदींनी परिश्रम घेतले .