जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन : ४० मजली इमारती इतके खोल

0

जेव्हा चीनचा विचार केला जातो तेव्हा लोक चिनी लोकांनी तयार केलेल्या अद्वितीय तंत्रज्ञानाचा विचार करतात. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्तम उदाहरण म्हणून चीन चे नाव घीतले जाते. चीनमध्ये एक अतिशय खोल मेट्रो स्टेशन आहे, जे केवळ चीनमधील सर्वात खोल मेट्रो स्टेशन नाही तर ते जगातील सर्वात खोल (World’s Deepest Metro Station)मेट्रो स्टेशन देखील मानले जाते. सध्या या मेट्रो स्टेशनशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला त्या स्टेशनच्या बाहेरून आत जाते आणि ते किती खोल आहे हे दाखवते. ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अलीकडेच @jen_l104 या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक महिला चीनच्या शौनकिंगमधील होंगयानकुन (चोंगक्विंग) मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. ती सांगते की हे चीनमधील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटसह, इतर अनेक पोर्टल्सनी देखील दावा केला आहे की हे जगातील सर्वात खोल सबवे स्टेशन आहे.

View this post on Instagram

A post shared by Jen Liang (@jen_l104)

स्टेशन ४० मजली इमारती इतके खोल 
अहवालानुसार, या स्थानकाची खोली ११६ मीटर आहे. या संदर्भात, ती सुमारे ३५ ते ४० मजली इमारती इतकी खोल आहे. जेव्हा लोक या मेट्रो स्टेशनच्या आत लिफ्टने जातात तेव्हा त्यांचे कान देखील अडकतात. या मेट्रो स्टेशनच्या बांधकामादरम्यान मजुरांना तळापासून वर येण्यासाठी ३८ मिनिटे लागली. आता, एस्केलेटर आणि लिफ्टच्या नेटवर्कमुळे, लोकांना आत जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी १० मिनिटे लागतात. त्याचे बांधकाम २०१७ मध्ये सुरू झाले, जे २०२२ मध्ये पूर्ण झाले.हे ठिकाण डोंगराळ भागात आहे, त्यामुळे मेट्रो बनवणाऱ्या लोकांना ते मेट्रो लाईनशी जोडण्यासाठी खोल खोदावे लागले.

व्हिडिओ व्हायरल होत आहे
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, स्टेशनच्या पलीकडे जाण्याआधी महिलेला किती एस्केलेटर पार करावे लागले. आतमध्ये इतके एस्केलेटर आहेत आणि लोकांना इतके चालावे लागते की तुम्हाला वाटेल की दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी बुक करणे चांगले झाले असते. या व्हिडिओला 14 लाख व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी या व्हिडिओवर आश्चर्यही व्यक्त केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.