रेडिओ विश्वासच्या ‘मिशन ऑलिम्पिक शो’ला जगभरातून प्रतिसाद

0

नाशिक (प्रतिनिधी) – ऑलिम्पिकमध्ये निवड झालेल्या भारतीय खेळाडूंची माहिती जगभर पोहचावी व नव्या पिढीने या खेळाडूंचा आदर्श घ्यावा या उद्देशाने रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओतर्फे ऑनलाईन मुलाखतीच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविला आहे. विजयी झाल्यानंतर सर्वच लोक विजेत्याची मुलाखत घेतात मात्र ऑलिम्पिकमध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन करर्‍यासाठी त्यांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी आणि त्यांनी इथे पोहचण्यासाठी केलेल्या मेहनतीचा परिचय सर्वांना व्हावा म्हणून मुलाखती घेण्यात आल्या.

रेडिओ विश्वाच्या आरजे स्नेहल जाधव यांनी झुम मिटींगच्या माध्यमातून या मुलाखती घेतल्या. यामध्ये १३ खेळाडूंच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये योगेश काथूनीया (भाला फेक), मनोज सरकार (बॅडमिंटन), हरविंदर सिंग (तिरंदाज), राहुल रोहिला (रेस वाकर), दीपक कुमार (शूटर), के.टी. इरफान (रेस वाकर), गुरूप्रित सिंग (रेस वाकर), विरेन्द्र धनकर (गोळा फेक), विनोद मलिक (थाळी फेक), अमित सरोहा (थाळी फेक), एकता भयाण (क्लब थ्रोवर), सुयश जाधव (स्वीमर), कर्णम मल्लेश्वरी (धावपटू) या खेळाडूंचा समावेश होता.

यापैकी योगेश काथूनीया (सिल्व्हर मेडल भाला फेक), मनोज सरकार (ब्राँझ मेडल बॅडमिंटन) व हरविंदर सिंग (ब्राँझ मेडल तिरंदाज) यांनी पॅराऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई केली. या खेळाडूंची माहिती सर्वदूर लोकांपर्यंत पोहचली. रेडिओ विश्वासच्या मिशन ऑलिम्पिक शोमुळे पॅरा अ‍ॅथलिट खेळाडू जगभरात पोहोचले.

या शो ला जनतेकडून जोरदार प्रतिक्रिया आल्या. अनेक लोकांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली. युवावर्गाला खेळ हे करियरसाठी क्षेत्र आहे त्याविषयी माहिती मिळाली. रेडिओ विश्वास जगातील एकमेव कम्युनिटी रेडिओ आहे ज्यांनी अशाप्रकारचा उपक्रम राबविला. रेडिओ विश्वासने टोकियोवरून खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या.

मिशन ऑलिम्पिक यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन विश्वास जयदेव ठाकूर, स्टेशन डायरेक्टर डॉ. हरी कुलकर्णी, समन्वयक रूचिता विश्वास ठाकूर, आरजे स्नेहल जाधव व टीम रेडिओ विश्वास यांनी प्रयत्न केले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.