You are my BFF विषय संपला -त्रिशूल मराठे ! समृद्धी आणि त्रिशूलचं लुटुपुटुच भांडणं 

BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये वादाची पहिली ठिणगी !

0

मुंबई १४ ऑक्टोबर, २०२२ – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कलर्स मराठी आणि Airtel द्वारे आयोजित केलेल्या कॉन्टेस्ट मधून त्रिशूल मराठेला बिग बॉस मराठीचा सदस्य होण्याची सुवर्णसंधी मिळाली. महेश मांजरेकर यांनी त्याचे कौतुक देखील केले. घरामध्ये त्रिशूलचे सगळ्या सदस्यांसोबत तसे चांगले नाते आहे. काही दिवसांमध्येच समृद्धी आणि त्रिशूलची चांगली मैत्री झाली हे बघायला मिळत आहे आणि त्याच विषयी आज चर्चा करताना दिसणार आहेत. समृद्धी त्रिशूलवर जरा नाराज आहे आणि त्याच्याशी बोलताना दिसणार आहे कि, “या घरात तुला आता दुसरा BFF मिळाला आहे, मित्र खूप होऊ शकतात पण बेस्ट फ्रेंड एकच असतो.” त्यावर त्रिशुलचं म्हणणं आहे, “पण तू तर म्हणाली अक्षय आहे ना तुझा BFF.” त्यावर समृद्धी म्हणाली, “नाही … कोण बोलं तुला ? काल मी थोडी नाराज होती तुझ्या वागण्यामुळे म्हणून… त्रिशूल आता भांडेन मी तुझ्याशी”.  मग भांडताना हसू नकोस… You are my BFF विषय संपला – त्रिशूल.

BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये वादाची पहिली ठिणगी !
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  BFF अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये पडणार वादाची पहिली ठिणगी, कारण काय तर जेवण बनवणे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये डिसऑन येत आहे कि, अमृता तेजस्विनीवर जेवणाच्या मुद्द्यावरून भडकली आहे. आणि याच वरून दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली. तेजस्विनी तू आता काय करते आहेस ? त्यावर तेजस्विनी म्हणाली, “तू जेवणावर काढतेस आहेस मी बनवणार नाही हि पध्द्त नव्हे त्यावर अमृताचा पारा चढला “हो हीच पद्धत आहे आता” असे अमृताने तेजस्विनीला ठणकावून सांगितले. तेजस्विनीचे म्हणणें आहे, “अरे रा वीची भाषा नको करुस, हाय वे माय वे मला नाही चालतं.” अमृता स्वतःशी बोलताना म्हणाली, “सगळ्यांचीच मनधरणी करायला आली आहे मी.” घरामध्ये झाल्या प्रकारामुळे अमृताला अश्रू अनावर झाले. बघूया आजच्या भागामध्ये या दोघींमधील भांडणं मिटेल कि अजूनच वाढेल?

मी कट्टर आहे – अपूर्वा  !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा, रुचिरा आणि समृद्धीमध्ये रंगणार आहे चर्चा. ज्यामध्ये अपूर्वा रुचिरासमोर आपला मुद्दा मांडताना दिसणार आहे. अपूर्वा रुचिराला सांगताना दिसणार आहे, “त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुला सांगते कि आपलं हे ठरलं होतं कोणी जिंकू दे अक्षय किंवा रोहित आपणं दोघांच्या आनंदात क्लिअर आहोत… मला काळजी तुझी वाटतं होती कारण तू नॉमिनेटेड आहेस. आणि हि तुझी सिद्ध करण्याची संधी होती, हे देखील मी तुला पोट तिडकीने सांगत होते. आता हे सगळं करत असताना, जर आज मी रोहितच्या बाजूने खेळते आहे तर मी अक्षयच्या बाजूने नाही बोलणार मी अशी मुलगी आहे… “मी कट्टर आहे” आणि याच मुद्द्यावरून माझं आणि समृद्धीचं वाजलं होतं. कारणं मला तेजस्विनीने जिंकावं (पहिले कॅप्टन्सी कार्य) असं वाटतं होतं, आणि जे चुगलीमध्ये आलं देखील. मी तेजूच्या बाजूने खेळतं होते आणि म्हणून समृद्धी भडकली होती. मी नाही biased खेळू शकतं. मी जर एका व्यक्तीला पाठिंबा देत असेन तर मी त्याच्याच नावाने बोलबाला करेन”. आता या सगळ्यावर रुचिरा आणि समृद्धीचे काय म्हणणे आहे बघूया आजच्या भागामध्ये.

बघूया आजच्या भागामध्ये पुढे काय घडले. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!