“निगेटिव्ह लोकांना तुम्ही सपोर्ट करता आहे” – अमृता धोंगडे !

0

मुंबई १ नोव्हेंबर,२०२२ – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपावले विष – अमृत हे नॉमिनेशन कार्य. जो सदस्य पेटारा उघडून त्यातील विष मिळवेल तो ठरवेल विरोधी टीममधील कोणता सदस्य नॉमिनेट होईल. तसेच सदस्याला सुरक्षित देखील करण्याची पॉवर सदस्यांना दिली गेली. आणि याच टास्कमध्ये जिथे प्रसादने अमृता देशमुखला नॉमिनेट केले तिथे स्नेहलताने अमृता धोंगडे आणि अपूर्वा मधून अमृता धोंगडेला नॉमिनेट केले. स्नेहलताने टास्क दरम्यान दिलेलं कारणं कुठेतरी अमृताला पटलं नाही. अमृता तेजस्विनी समोर नाराजी व्यक्त करणार दिसणार आहे. आता नक्की तिच्या नाराजीचे काय कारण आहे हे आजच्या भागात कळलेच. काल अमृता देशमुख, अमृता धोंगडे, प्रसाद जवादे, विकास, त्रिशूल, किरण, समृद्धी घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत.

अमृताचे म्हणणे आहे, मला माहिती आहे माझी लीडरशिप क्वालिटी निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह लोकांना तुम्ही सपोर्ट करता आहे आणि आम्हाल नाही करत याची काय गरज आहे तेजा. तेजस्विनीचे म्हणणे आहे, कुठे सपोर्ट करतो आहे तिच्या निकषांवर ती पॉइंट ५ ने उजवी पडली. तर, दुसरीकडे स्नेहलता अपूर्वा आणि अमृता देशमुख सोबत बोलताना दिसणार आहे. स्नेहलताचे म्हणणे आहे मला चुकीचे निर्णय नाही द्यायचे आहेत. ज्याने एखादा नॉमिनेशन मध्ये येईल. ते मला जे म्हणतात ना मी नाही घाबरत वैगरे … घाबरण किंवा नाही घाबरण हा प्रश्न नाहीये. मी माझ्या निर्णयाबद्दल साशंक झाले. अमृता देशमुख म्हणाली, तुला आता जरी वाईट वाटत असेल तरी त्यांच्यासमोर बोलताना ठाम राहा कारण ते हो हो म्हणत आहेत पण ते कधीही हा विषय काढतील.स्नेहलता म्हणणे आहे, निकष चुकला नव्हता ना ? फक्त मी मांडताना वाक्यरचना चुकली आहे.

समृद्धी प्रसाद मध्ये शाब्दिक बाचाबाची!
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्क दरम्यान, टास्कवरून भांडणं, मारामारी, शाब्दिक चकमक, आरोप – प्रत्यारोप हे होताना आपण बघत आलोच आहे. आज असंच काहीसं प्रसाद आणि समृध्दी मध्ये होणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये प्रसाद समृध्दीला सांगताना दिसत आहे, धीर धरना जरा सगळ्यांना येऊ देत मग ऐकव ना ? त्यावर समृध्दीने त्याला ऐकवले “शपथ हा डोक्यात जातो …” प्रसादने लागलीच उत्तर दिले तू पण डोक्यात जातेस. समृध्दी – प्रसाद गप्प बस… नीट राहा प्रसाद … आणि इथून त्यांच्या वादाला सुरुवात झाली… समृध्दी लांब राहा … प्रसाद – तू पण लांब राहत जा … येडी कुटली … आता हा वाद कुठवर गेला? पुढे काय झालं ? आज कळेलच.

बघूया पुढे काय होईल ते आजच्या भागात. बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!