आदेश भाऊजींने ट्रॉलर्सना सुनावले खडे बोल

0

मुंबई – होम मिनिस्टर हा झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम गेली १८ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आला आहे आणि इतकंच नव्हे तर महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतभरातील वहिनींचा सन्मान करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं आहे. नुकतंच होम मिनिस्टरचं नवीन पर्व महामिनिस्टर हे प्रेक्षकांच्या भेटीस असून या पर्वाच्या विजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार आहे. सोन्याची जर आणि हिरे जडलेल्या या पैठणीची चर्चा सगळीकडे सुरु असताना  अनेक ट्रोलर्सने त्याबद्दल ट्रोलिंग सुद्धा सुरु केलं.

त्या ट्रॉलर्सना नुकतंच एका मुलाखतीत आदेश बांदेकरांनी खडे बोल सुनावले. आदेश बांदेकर याबद्दल म्हणाले, “जे ११ लाखांच्या पैठणीवरून मला किंवा वाहिनीला ट्रोल करत आहेत, त्यांना कदाचित माहिती नाही आहे कि ती मी देणार नाही आहे. ती पैठणी प्रयोजकांकडून येते, झी मराठी या वाहिनीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आणि मी या कार्यक्रमाचा निवेदक आहे. हे समीकरण ज्यांना कळत नाही तिथेच त्या ट्रोलिंगकडे गांभीर्याने बघण्याचा विषय संपतो.

तसंच १८ वर्ष सतत हा कार्यक्रम सुरु आहे म्हणजेच दररोज १ पैठणीच्या हिशोबाने जवळपास साडेपाच हजारापेक्षा जास्त पैठण्या या कार्यक्रमातून वहिनींना मिळाल्या आणि त्यामागे जो विचार आहे तो काहींना कळत नाही त्यामुळे हे ट्रोलिंग होतं. ११ लाखांची पैठणी हि येवलेमध्ये बनतेय आणि हि पैठणी बनवणारे कारागीर जे आहेत ते मूकबधिर आहेत. त्यामुळे पैठणीची किंमत ११ लाख असली तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतोय. हा चांगला उद्देश अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नसेल त्यामुळे हे ट्रोलिंग होतंय. पण या पैठणीपेक्षा हे कारागिरांचा आणि वहिनींचा आनंद हा लाखमोलाचा आहे.”.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!