किचन कल्लाकारच्या किचनमध्ये बच्चेकंपनीचा कल्ला

0

मुंबई – झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात पण या आठवड्यात त्यांचे लाडके बालकलाकार महाराजांना त्याच्या इवल्याश्या हाताने पदार्थ करून देणार आहेत.

अभिजित गुरु आणि समिधा गुरु यांची कन्या दुर्वा गुरु, नाळ चित्रपटातील चैत्या म्हणजेच श्रीनिवास पोकळे आणि गायक मंगेश बोरगावकर यांची चिमुकली मीरा बोरगावकर किचन कल्लाकारच्या आगामी भागात सहभागी होणार आहेत. हि बच्चेकंपनी किचनमध्ये तर कल्ला करणारच आहे पण त्यांची धमाल मजा मस्ती प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करेल. चिमुकली मीरा तिच्या बाबांना जर ते शाळेत जात असतील तर त्यांना आई म्हणून सूचना देताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इतकंच नव्हे तर मुलं आणि त्यांचे वडील यांच्यासोबत कार्यक्रमात मजेदार गेम्स देखील पाहायला मिळतील.

तेव्हा या किचन कल्लाकारच्या मंचावर कोण सगळ्यात जास्त छान पदार्थ बनवून महाराजांना खुश करणार आणि बच्चेकंपनी आपल्या निरागसतेने प्रेक्षकांचं मन कसं जिंकणार हे बघण्यासाठी पाहायला विसरू नका मस्त मजेदार किचन कल्लाकार बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!