सुखकर्ता दुःखहर्ता

अभिनेत्री दीपा परब,धनश्री काडगावकर, शिवानी नाईक,अभिनेता रोहित परशुराम यांनी सांगितल्या आठवणी

0

मुंबई,३०ऑगस्ट २०२२ – सगळे जण ज्याची आतुरतेने वाट बघत आहे अश्या सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार असून झी मराठीवर येत असलेल्या नवीन मालिकां मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब, धनश्री काडगावकर , शिवानी नाईक आणि अभिनेता रोहित परशुराम ह्यांनी  आपआपल्या घरी गणेश उत्सव कसा साजरा केला जातो या बद्दल आपल्या आठवणी व्यक्त केल्या आहेत.

zee marathi Sukhakarta Dukhaharta

“तु चाल पुढं” या मालिकेत ‘अश्विनीच्या’ भूमिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री दीपा परब सांगते गणपती मला खूप प्रिय आहे, मी लोअर परळ ला राहायचे माझ्या करियर ची सुरवात गणेशोत्सवापासूनच झाली, या उत्सवातच कार्यक्रम करून  मी माझ्या करियरचा श्रीगणेशा केला. माझ्या घरी गणपती येत नाही पण घरी देवघरातल्या  गणपतीची मी मनोभावे पूजा करते. मोदक आणि पाच प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य त्याला असतो. ह्या वर्षी मी ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या  निमित्ताने पुन्हा पदार्पण करत आहे ते सुद्धा ह्या गणरायाच्या आशीर्वादानेच.

याच मालिकेतील ‘शिल्पी’ या भुमिकेत दिसणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर आपल्या आठवणीत रमताना सांगते कि,” लहानपणापासून ते आता पर्यंत आमच्या घरी गणेश उत्सवाची दहा पंधरा दिवस आधी पासूनच लगबग सुरु होते. माझ्या माहेरी गौरी गणपती असल्यामुळे सजावटीची तयारी करायची , सर्वानी मिळून गणरायाला आणायचे, गणेश उत्सव दरम्यान मोदकां सह वेग वेगळे पदार्थ करायचे आणि आनंदाने संपूर्ण गणेश उत्सव साजरा करायचा. मी लहापणी सोसायटीत साजऱ्या होणाऱ्या गणेश उत्सवातील स्पर्धांमध्ये भाग  घेत असे. तिथूनच मला माझ्यातील कलाकाराची ओळख झाली असे मला वाटते. वेळ बदलत गेली त्याप्रमाणे गणेश उत्सवाचे स्वरूपहि बदलत गेले. परंतु आता हि मी लहानपणी प्रमाणेच गणेश उत्सवाचा आनंद घेते.

‘अप्पी आमची कलेक्टर’ ह्या नव्या मालिकेतील अभिनेत्री शिवानी नाईक म्हणजे अप्पी गणेश उत्सवाबद्दल भर भरून सांगते कि, ” गणरायाचे आगमन होणार या कल्पनेनेच खूप उत्साह निर्माण होतो. सगळेजण जोरात तयारीला लागतात. माझ्या घरी देव घरातच गणपतीची स्थापना होत असे परंतु गेल्या वर्षी पासून अगदी व्यवस्थित सजावट करून गणपतीची स्थापना करतो. दुकानात जाऊन आपला गणपती शोधणे त्याला घरी घेऊन येत  असतानाचा पायी प्रवास खूप आनंद देणारा असतो. घरी आल्यावर आई त्याचे अगदी प्रेमाने औक्षण करते.  गणरायाला आवडणारे उकडीचे व तळणीचे मोदक तसेच अनेक गोडाचे पदार्थ करून गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. या वर्षी मी एक दिवसासाठी का होईना घरी जाऊ नक्की बाप्पाला भेटून त्याचा आशीर्वाद घेणार आहे.”

zee marathi Sukhakarta Dukhaharta

 

‘अप्पी आमची कलेक्टर’ ह्या मालिकेतील अभिनेता रोहित परशुराम म्हणजे अर्जुन आपल्या आठवण व्यक्त करताना सांगतो मला पाच वर्षाच्या महेनतीचं फळ या मालिकेच्या माध्यमातून मिळालं आहे. रोहित म्हणतो कि,” मी मूळचा भोरचा आहे, तिथे खूप दणक्यात गणेश उत्सव साजरा केला जातो. पूर्वी गणेश उत्सवात जिवंत देखावे निर्माण केले जात असत त्यात माझ्या भावाचा हि सहभाग असायचा.  मी लहानपणी मातीचे नाग पंचमी साठी नाग , बैल पोळ्या साठी बैल,तसेच गणेश उत्सवासाठी छोटी गणपती मूर्ती ही बनवायचो, ती फार सुबक नसली तरीही छान असायची तो आनंद काही वेगळाच असायचा. गणपतीत मी बाप्पासोबत २१ मोदक सुद्धा खातो. लालबागच्या राजावर माझी नितांत श्रद्धा असून बाप्पाची माझ्यावर खूप कृपा आहे असे मला मनोमन वाटते. सगळ्यांना माझ्याकडून गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.”

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!