नाशिकच्या ११ कलाकारांना प्रसारभारतीची मानाची B High ग्रेड

0

नाशिक,५ डिसेंबर २०२२ – प्रसारभारती ,भारत सरकार यांच्या शास्त्रीय संगीतातील ऑडिशनचा निकाल नुकताच जाहीर झाला असून नाशिकमधील ११ कलाकारांना मानाची B High ग्रेड प्राप्त झालेली  आहे. यात पाच तबलावादक ,चार गायक आणि दोन संवादिनी वादक यांचा समावेश आहे.

तबलावादनात सुजीत काळे , गौरव तांबे ,आदित्य कुलकर्णी ,अद्वय पवार आणि अथर्व वारे ,  संवादिनी वादनात ईश्वरी दसककर आणि सुरश्री दसककर  ,शास्त्रीय गायनात ज्ञानेश्वर कासार ,कल्याणी दसककर तत्ववादी तर उपशास्त्रीय गायनात शिवानी मारुलकर दसककर,गौरी दसककर आणि कल्याणी दसककर तत्ववादी यांना ही ग्रेड मिळाली आहे. या उत्तुंग यशामुळे शहराच्या संगीत क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून सर्व कलाकार आणि त्यांच्या गुरूंचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

कलाकारांचे परिचय

ज्ञानेश्वर संजय कासार

Dnyaneshwar Kasar
      

भारत सरकारच्या प्रसार भारतीतर्फे
शास्त्रीय संगीताची B-high ही grade प्राप्त झाली आहे…
संगीताचे प्राथमिक शिक्षण सौ. स्वाती देशमुख, श्री.राजेश पुराणिक यांच्याकडे झाले..
पुढील शिक्षण पतियाला घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं.सुरेश वाडकर यांच्याकडे झाले..
सध्या, किराणा घराण्याचे पं.अविराज तायडे यांच्या पुढील शिक्षण सुरु आहे.. याशिवाय, सुगम संगीताचे शिक्षण श्री.संजय हांडे, श्री.श्रीकृष्ण चंद्रात्रे आणि श्री.श्रीनिवास खळे यांच्याकडे झाले आहे…
संगीतात पदवी-पदव्युत्तर शिक्षण विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण…
संगीतात NET ही सलग दोन वेळा उत्तीर्ण होण्याचा मान…
सध्या संगीतात डॉक्टरेट करित आहे…
TIMES MUSIC व VENUS MUSIC या नामवंत कंपनीने अनेक ध्वनीमुद्रिका प्रकाशित करण्यात आली आहे…
शिवाय, अनेक जेष्ठ-श्रेष्ठ कलावंतांसोबत भारतभर सांगितिक कलाकृतींमध्ये सहभाग…
मानाचे अनेक पुरस्कार प्राप्त…

शिवानी मारुलकर दसककर      

Shivani Marulkar Dasakkar

१) शास्त्रीय संगीताचे प्रारंभिक शिक्षण वयाच्या ६व्या वर्षापासून आजोबा व थोर गायक पं. राजाभाऊ देव यांच्याकडे झाले. त्यानंतर समग्र गायकीची सखोल तालीम आई व विख्यात गायिका डॉ. अलका देव मारूलकर यांच्याकडे चालू आहे.
२) संगीत विषयात M.A. उत्तीर्ण.
३) भारत सरकारची junior व senior टॅलेंट scholarship मिळाली आहे.
४)अनेक पुरस्कारांनी सन्मानित तसेच देशात आणि परदेशात अनेक कार्यक्रम झाले आहेत.

सुजित सुहास काळे

Sujit Kale

१)तबल्याचे प्रारंभिक शिक्षण  कै .पं. भानुदास पवार यांचे कडे झाले .सध्या श्री. नितीन पवार आणि तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे कडे पुढील शिक्षण चालू आहे.
२)2009 साली तबला वादनाच्या उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती.तबला विषयात M.A.आणि NET परीक्षा उत्तीर्ण.सध्या नाशिकच्या K.K Wagh college of Performing arts महाविद्यालयाच्या संगीत विभागात तबला विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
३) भारतभर स्वतंत्र तबला वादनासोबतच अनेक मान्यवर कलाकारांसोबत गायन,वादन आणि कथक नृत्याची साथ संगत केली आहे.
४)  प्रसारभारती, भारत सरकार यांची तबलावादनासाठी B High ग्रेड प्राप्त झाली आहे.

गौरव सुनील तांबे

Gaurav Tambe

गुरु :- श्री नितीन पवार
पद्मश्री पं.सुरेश तळवलकर जी (पुणे)
पं. रामदास पळसुले (पुणे),
रुग्वेद तबला अकादमीकडून नादसाधक पुरस्कार,
पंचवटी महाविद्यालयातील उत्कृष्ट तबला वादक पुरस्कार,
भारत मंत्रालय शिष्यवृत्ती धारक, अल्फा टीव्ही मराठी सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार एकांकिका कायद्यासाठी,
साथसंगत :- पं.राम देशपांडे, विवेक सोनार, हिमांशू नंदा, प्रसाद खापर्डे, अर्चना कान्हेरे, फारुख लतीफ इ….
शहर:- दिल्ली, नागपूर, गोवा, जयपूर, पुणे, मुंबई, नगर औरंगाबाद अनेक शहरे
परदेशी:- सिंगापूर आणि मलेशिया दौरा
नाशिक मधे सम-काल  तबला आणि कथ्थक नृत्य अकादमी चे संचालक..विद्या दानाचे काम करत आहे….धन्यवाद

आदित्य अविनाश कुलकर्णी

Aditya Kulkarni

प्राथमिक शिक्षण श्री प्रभाकर जोशी यांच्यापासून सुरू झाले,पुढील शिक्षण श्री.नितीन वारे यांच्या कडे झाले.
• २०१२ पासून पंडीत जयंत नाईक यांच्याकडे चालू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी तबला विशारद पदवी संपादन केली.
• शारदा संगीत विद्यालय मुंबईमधूनतबला अलंकार पदवी संपादन केली
आत्ता पर्यंत मिळालेले सन्मान –
•”तबला श्री”(सम संस्था,दिल्ली)
•”अटल पुरस्कार” (अटल क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, दिल्ली)
• “आदर्श शिक्षक पुरस्कार”( महावीर इंटरनॅशनल,नाशिक)
• २०१९ मध्ये रेडिओचे मान्यताप्राप्त कलाकार म्हणुन पद्व़ी मिळाली.
• अशोका युनिव्हर्सल (अशोका मार्ग ) स्कूलमध्ये संगीत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे.
शिक्षण -Bcom,MA music,Tabla Alankar
All India Radio चे *”B High” Grade* प्राप्त कलाकार आहे.
आतापर्यंत मुंबई, पुणे ,अहमदनगर, लातूर, सोलापूर आणि महाराष्ट्राबाहेरीलही दिल्लीसह इतर कार्यक्रमांत वादनकला सादर केली आहे. संगीत क्षेत्रात पं. सत्यशील देशपांडे यांचे पं. कुमार गंधर्व, रामदास कामत, मधुवंती दांडेकर, रजनी जोशी, शुभदा दादरकर, बकुल पंडित, संगीत दिग्दर्शक कल्याणजी आनंदजी, संगीत दिग्दर्शक रवींद्र जैन, पं. अवीराज तायडे, रेखा नाडगौडा, श्रीकृष्ण चंद्रात्रे, ज्ञानेश्वर कासार, रागिणी कामतीकर एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे.
माझे पालक आणि गुरु यांचा भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद या सगळ्या कार्याचे श्रेय त्यांना जाते. अनेक विद्यार्थ्यांना अशोका तसेच स्वतःच्या तबला अकादमीमध्ये तयार केले आहे. माझे विद्यार्थी स्वतंत्रपणे सादरीकरण करत आहेत काही विद्यार्थी विशारद पुर्ण देखील झाले आहे.

अथर्व नितीन वारे

Atharva Ware

वयाच्या 5 व्या वर्षांपासून तबल्याचे शिक्षण वडील श्री नितीन वारे ह्यांच्या कडे घेतले आणि सध्या प्रख्यात तबला वादक पं .नयन घोष जी (मुंबई) ह्यांच्या कडे शिक्षण चालू आहे..तबल्यात B.A aani M.A केल आहे आणि तशेच गंधर्व महाविद्यालयाचे विशारद आणि अलंकार पूर्ण केल आहे ..सध्या Ashoka universal school मध्ये तबला शिक्षक म्हणून कार्यरत आहे ..तबल्यात भारत सरकारची मनाची CCRT scholarship  मिळाली आहे …तशेच आकाशवाणीचा B HIGH GRADE मान्यता प्राप्त कलाकार आहे ..मला नांदेड इथे झालेल्या नॅशनल लेवल स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि गोल्ड मेडल  मिळालं आहे ..तशेच मुंबई इथे झालेल्या बंदीश तबला वादन स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि ह्या वर्षीचा दिला जाणारा उस्ताद .अमीर हुसेन खा साहेब हा मनाचा पुरस्कार मिळाला ..तशेच मला पं .नारायण काका जोशी पुरस्कार प्राप्त झाला आहे ..बऱ्याच नामवंत ठिकाणी भारत भरात सोलो वादन केले आहे आणि साथ संगत पण केली आहे …

अद्वय नितीन पवार

Adway Pawar

तबल्याचे प्रारंभिक शिक्षण वडील श्री नितीन पवार यांच्याकडे .. व पुढील शिक्षण गेल्या 6 वर्षांपासून पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्याकडे चालू आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याची तबला वादनाची शिष्यवृत्ती प्राप्त
2016 साली स्पेन येथे झालेल्या संगीत मोहोत्सवात सहभाग आणि भारताचे प्रतिनिधित्व
B High ग्रेड प्राप्त झाली आहे

ईश्वरी सुभाष दसककर

Ishwari Dasakkar

ईश्वरी सुभाष दसककर ही दसककरांच्या घरातील चौथी पिढी. ती नाशिक मधील ज्येष्ठ संगीतज्ञ पंडित प्रभाकर दसककर यांची नात आहे तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनी वादक व उस्ताद शाहीद परवेझ यांचे शिष्य पंडित सुभाष दसककर यांची कन्या आहे.

ईश्वरीला लहानपणापासूनच संगीताचे दैवी देणगी लाभलेली आहे. तिला खूप लहान वयात स्वरज्ञान प्राप्त झाले व ती अवघडात अवघड नोटेशन ओळखू लागली. तिचे शिक्षण वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वडील श्री सुभाष दसककर यांच्याकडे सुरू झाले. ती बावीस वर्षांपासून हार्मोनियमचे प्रशिक्षण घेत आहे. संवादिनी वादनाबरोबरच ईश्वरी गाण्यात पारंगत आहे.

तिला संवादिनी वादनाकरिता भारत सरकार कडून मानाची स्कॉलरशिप मिळालेली आहे व नुकतीच तिला भारत सरकार, आकाशवाणी, प्रसार भारतीतर्फे संवादिनी वादनसाठी पहिल्याच प्रयत्नात B High grade प्राप्त झाली आहे. तसेच ख्यालगायकीसाठी सुलश्री प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे स्कॉलरशिप मिळाली आहे. याबरोबर तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. ज्ञानगंगा पुरस्कार, देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार, रासबिहारी इंटरनॅशनल अवॉर्ड प्रथम क्रमांक, पूर्णवाद बालकलाकार पुरस्कार, लावण्यवती पुरस्कार, शक्ती पुरस्कार, ब्रम्हचैतन्य पुरस्कार, पवार तबला अकॅडमी पुरस्कार, यांसारखे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तिने जयपूर घराण्याच्या गायकीची तालीम पं मंजिरी असनारे केळकर यांच्याकडे तसेच समग्र गायकीचे शिक्षण डॉक्टर अल्का देव मारुलकर यांच्याकडे घेतले आहे.

पं बिरजू महाराज, पं राजन साजन मिश्रा, पं रोणू मुजुमदार,पं विश्वमोहन भट, पं सुरेशदादा तळवलकर, पं रामदास पळसुले, पं अरविंद कुमार आझाद, पंडिता आशा खाडिलकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकार यांचे आशीर्वाद तिला लाभलेले आहेत

तिने भारतातील अनेक नामवंत महोत्सवांमध्ये एकल गायन एकल वादन व मान्यवरांना साथसंगत असे कार्यक्रम सादर केले आहे. वर्ल्ड हार्मोनियम समीट बंगलोर, स्वरेंदु बालकलाकार सम्मेलन मुंबई, मोघुबई कुर्डीकर संमेलन गोवा, पूर्णवाद महोत्सव पारनेर, वसंतोत्सव पारनेर, बालगंधर्व महोत्सव जळगाव, बाल कलाकार संमेलन पुणे, सुश्री सीता पवार संगीत संमेलन खंडवा मध्य प्रदेश, निनादिनी संगीत महोत्सव गोवा, देवगंधार संगीत संमेलन, गोपीकृष्ण महोत्सव, श्यामरंग संगीत समारोह, उत्तुंग परिवारतर्फे स्वरोन्मेष संगीत समारोह यांसारखे अनेक.

ती तीन वर्षाची असताना तिने पं बिरजू महाराज यांच्या मांडीवर बसून त्यांना सत्तर रागाचे नोटेशन ओळखून दाखवले होते.तिने आपली कला एबीपी माझा, झी24तास, झी युवा, कलर्स मराठी, डीडी सह्याद्री यांसारख्या विविध टीव्ही चॅनेल्सवर सादर केली आहे. तसेच आकाशवाणी केंद्र मुंबई, रेड एफएम, माय एफएम, रेडिओसिटी यांसारख्या नामांकित रेडिओ चॅनल्सवर आपली कला व मुलाखत सादर केली आहे.

तिने डॉ अलका देव मारुलकर, पं शुभदा पराडकर, पं अरविंदकुमात आझाद, पं मनीषा साठे, पं रघुनंदन पणशीकर, पं मंजुषा पाटील, पं अपूर्वा गोखले पल्लवी जोशी पं पौर्णिमा धुमाळे, पं अपर्णा पणशीकर, सुमेधा देसाई, यांसारख्या दिगग्ज कलाकारांना साथसंगत केली आहे. ती संगीत संयोजक, संगीतकार, रचनाकार आहे व शॉर्टफिल्म्स व नाटक प्रोजेक्ट्ससाठी संगीत दिगदर्शनाचे काम करते.

अभ्यासाच्या बाबतीत ईश्वरी हुषार विद्यार्थिनी आहे. तिने संगीतात एम ए पदवी प्रथम श्रेणीत व महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. ती गायन वादन विशारद आहे. मानसशास्त्र या विषयात पदवीधर आहे.

कु. गौरी संजय दसककर

Gauri Dasakkar

शिक्षण- मराठी साहित्यात बीए आणि संगीतात एम.ए.
संगीत विशारद व्होकल हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन A+ ग्रेडसह.
संगीतकार आणि कलाकारांच्या कुटुंबात जन्मलेल्या, आदरणीय पं. प्रभाकरशास्त्री गोविंद दसककर यांची नात.
गुरु आणि आजोबांचे पं. प्रभाकरशास्त्री गोविंद दसककर, काका पं. सुभाष दसककर, काका श्री. माधव दसक्कर यांचे  बालपणापासून मार्गदर्शन लाभले आहे. त्याचप्रमाणे विदुषी सौ. मंजिरी असनारे केळकर यांचे 8 वर्ष। मार्गदर्शन लाभले असून  आता विदुषी डॉ. अलका देव मारुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल प्रशिक्षण घेत आहेत.
विविध शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये स्थानिक, जिल्हा व राज्य स्तरावर विविध संस्थांद्वारे गायन व वादनात अनेक पारितोषिके मिळविली.
भारतीय शास्त्रीय गायन संगीतात भारत सरकारची CCRT शिष्यवृत्ती मिळाली.
“वसंतोत्सव” येथे सादर केले आणि सोबत; पारनेर, बालगंधर्व महोत्सव जैन हिल्स जळगाव, पं. गोपीकृष्ण महोत्सव नाशिक; सरस्वती पुरस्कार महोत्सव नाशिक, जागतिक हार्मोनियम समिट बंगलोर, स्वर्णमहोत्सव पुणे, कलानंद नृत्य संस्था ठाणे, गांधर्व महाविद्यालय पुणे, वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान जळगाव, काळाराम मंदिर नाशिक इ. अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर केले आहे.
अनेक ठिकाणी शास्त्रीय संगीत आणि संगीताचे इतर प्रकार सादर केले.
अनेक दिग्गज कलाकारांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळाली. राजन मिश्रा, पं.साजन मिश्रा, पं. बिरजू महाराज जी, पं. सुरेशदादा तळवलकर, पं. किशोरी ताई आमोणकर, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खान, पं. आशा ताई खाडिलकर, पं. अरविंदकुमार आझाद पं. रामदास पळसुले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले…
सर्व रेडिओ चॅनेल आणि ‘एबीपी माझा’, ‘झी 24 तास’, ‘झी युवा’ आणि ‘कलर्स मराठी’, ‘सूर नवा ध्यास नवा’, ‘सह्याद्री वाहिनी’ ‘मैत्र हे शब्द सुरांचे’  यांसारख्या T.V चॅनेलवर पाहुणे कलाकार म्हणून दसककर बहिणींच्या सोबत सुसंवाद आधारित गाणी सादर केली. ‘
स्वरसंगतीचे नवनवीन प्रयोग अनेक वर्षांपासून केले जात आहेत.
तुम्ही ‘दसककर सिस्टर्स’ युट्युब चॅनल सबस्क्राईब करू शकतात आणि ‘दसककर सिस्टर्स’ फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करू शकता.

सुरश्री सुभाष दसककर (पूजा)

Surashri Dasakkar

सुरश्री सुभाष दसककर ही दसककरांच्या घरातील चौथी पिढी. ती नाशिक मधील ज्येष्ठ संगीतज्ञ पंडित प्रभाकर दसककर यांची नात आहे तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनी वादक व उस्ताद शाहीद परवेझ यांचे शिष्य पंडित सुभाष दसककर यांची कन्या आहे.

सुरश्रीला लहानपणापासूनच संगीताची दैवी देणगी लाभलेली आहे. तिला खूप लहान वयात स्वरज्ञान प्राप्त झाले व ती अवघडात अवघड नोटेशन ओळखू लागली. तिचे शिक्षण वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वडील श्री सुभाष दसककर यांच्याकडे सुरू झाले. ती सतरा वर्षांपासून हार्मोनियमचे प्रशिक्षण घेत आहे. संवादिनी वादनाबरोबरच सुरश्री गाण्यात पारंगत आहे.

तिला संवादिनी वादनाकरिता भारत सरकार कडून मानाची स्कॉलरशिप मिळालेली आहे व नुकतीच तिला अतिशय लहान वयात भारत सरकार, आकाशवाणी, प्रसार भारतीतर्फे संवादिनी वादनासाठी B High grade पहिल्याच प्रयत्नात प्राप्त झाली आहे. त्याच बरोबर तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. स्वयमसिद्धा पुरस्कार,रासबिहारी इंटरनॅशनल शाळेकडून बक्षीस, पूर्णवाद बालकलाकार पुरस्कार, लावण्यवती पुरस्कार, शक्ती पुरस्कार, तसेच राहुल देशपांडे यांच्या हस्ते स्वरझंकार पुरस्कार, पंडित आनिंदो चॅटर्जी यांच्या हस्ते पवार तबला अकॅडमी पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तिने समग्र गायकीचे शिक्षण डॉक्टर अल्का देव मारुलकर यांच्याकडे घेतले आहे.

पं बिरजू महाराज, पं राजन साजन मिश्रा, पं रोणू मुजुमदार,पं विश्वमोहन भट, पं सुरेशदादा तळवलकर, पं रामदास पळसुले, पं अरविंद कुमार आझाद, पंडिता आशा खाडिलकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकार यांचे आशीर्वाद तिला लाभलेले आहेत.

तिने भारतातील अनेक नामवंत महोत्सवांमध्ये गायन वादन सादर केले आहे. वर्ल्ड हार्मोनियम समीट बंगलोर, स्वरेंदु बालकलाकार सम्मेलन मुंबई, पूर्णवाद महोत्सव पारनेर, वसंतोत्सव पारनेर, बालगंधर्व महोत्सव जळगाव, बाल कलाकार संमेलन पुणे, सुश्री सीता पवार संगीत संमेलन खंडवा मध्य प्रदेश, निनादिनी संगीत महोत्सव गोवा, देवगंधार संगीत संमेलन, गोपीकृष्ण महोत्सव, श्यामरंग संगीत समारोह, उत्तुंग परिवार तर्फे स्वरोन्मेष संगीत समारोह  यांसारखे अनेक महोत्सवांमध्ये गायन वादन सादर केले आहे.

ती तीन वर्षाची असताना सा रे ग म प लिटिल चँम्प्स या मंचावर तिला पाहुणे कलाकार म्हणून बोलावले गेले होते तेथे तेथे मान्यवरांनी कौतुक देखील केले. तिला पंडित बिरजू महाराजजींनी वसंतोत्सव दिल्ली येथे सादरीकरण करण्यासाठी संधी दिली होती तेव्हा तिला पंडित राजन साजन मिश्रा, भारतरत्न पंडित रविशंकर जी, तसेच जॅकी श्रॉफ यांसारख्या दिग्गजांचे आशीर्वाद लाभले. तिने आपली कला एबीपी माझा, झी टीव्ही, झी24तास, झी युवा, कलर्स मराठी, डीडी सह्याद्री यांसारख्या विविध टीव्ही चॅनेल्सवर सादर केली आहे. तसेच आकाशवाणी केंद्र मुंबई, रेड एफएम, माय एफएम, रेडिओ सिटी यांसारख्या नामांकित रेडिओ चॅनल्सवर आपली कला व मुलाखत सादर केली आहे.

तिने ‘गानयोगी’ या डॉक्युमेंटरी फिल्म मध्ये ज्येष्ठ गायक पंडित डी व्ही पलुस्कर यांच्या लहानपणीचा अभिनय केला आहे.अभ्यासाच्या बाबतीत सुरश्री हुशार विद्यार्थिनी आहे. सध्या ती वाणिज्य शाखेत पदवीधर शिक्षण दुसऱ्या वर्षात शिकत आहे.

कल्याणी दसककर -तत्ववादी

Kalyani Dasakkar Tatvavadi

1. एम ए संगीत (S.N.D.T University) गायन आणि संवादिनी वादनामध्ये संगीत विशारद
2 . लहानपणापासून आजोबा ज्येष्ठ संगीतज्ञ पंडित प्रभाकर दसककर काका आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संवादिनी वादक  श्री. सुभाष दसककर  आणि काका श्री. माधव दसककर यांच्याकडे संगीत शिक्षण झाले.
3. यानंतर जयपूर अत्रौली  घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी सौ.  मंजिरी असणारे केळकर यांच्याकडे आठ वर्ष जयपूर घराण्याची तालीम
4. गेल्या सात वर्षांपासून जयपुर किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी डॉ. अलका देव मारुलकर यांच्याकडे समग्र गायकीची तालीम घेत आहे. याचबरोबर संगीताचे शिक्षण पुढील पिढीला देत आहे.
5. S.N.D.T University मधून “गानहिरा’ पारितोषिक
6. कोल्हापूर येथील गायन समाज देवल क्लब तर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत ‘गोविंदराव पुणे’ स्मृती पुरस्कार हा जयपुर अत्रोली घराण्याचा विशेष पुरस्कार आणि पारितोषिक
7. पुणे येथे गानवर्धन कै. सरला नारायण कुलकर्णी स्मृती शास्त्रीय गायन पुरस्कार
8. चेंबूर येथे दा खडके प्रतिष्ठान आणि संगीत सम्राट उस्ताद अल्लादिया खा शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.
9. दूरचित्रवाणी वरील ‘स्पीक मॅके’ तर्फे आयोजित ‘नादभेद’  या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सादरीकरण
10. ऑल इंडिया रेडिओ तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातून शास्त्रीय गायनासाठी निवड
11. देवगंधार महोत्सवात शास्त्रीय गायन.
12. गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर 16 वे स्मृती संगीत संमेलनात गोवा येथे शास्त्रीय गायन
13. स्वराज तेजस्विनी फाउंडेशन तर्फे melodious classical singer  तेजस्विनी पुरस्कार
14. पंडित राजन साजन मिश्रा पंडित सुरेश दादा तळवलकर उस्ताद अमजद अली खान सरस्वती विदुषी किशोरीताई अमोल कर श्री श्रीधर फडके पंडित बिरजू महाराज जी लता मंगेशकर पंडित शिवकुमार शर्मा अशा अनेक दिग्गजांसमोर गायन सादरीकरण करून यांचे आशीर्वाद मिळाले आहेत
15. All India Radio (AIR)तर्फे घेण्यात आलेल्या audition मध्ये 1st attempt मध्ये B-High grade प्राप्त..

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!