ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ शुक्ल सप्तमी.ग्रीष्म ऋतू. शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ -सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज वृद्धी दिन”
आज जन्मलेल्या बाळाची राशी -कर्क/सिंह.
चंद्र नक्षत्र – अश्लेषा.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नात्यातून सुखद अनुभव मिळेल.आज तुमचे वागणे तऱ्हेवाईक असणार आहे.उपासना करणे आवश्यक आहे.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतानाच खर्चात वाढ किंवा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.विशेषतः व्यसने करणाऱ्या लोकांनी सावध राहावे.गायकांना यश मिळेल.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रणयरम्य दिवस आहे.आवडत्या व्यक्तीसोबत जलविहार कराल.खर्चात वाढ होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मेजवानी मिळेल.संध्याकाळ गृहसौख्याची.आवडत्या छंदासाठी खर्च कराल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) बुद्धिमता चमकून उठेल. प्रवासाचे बेत आखाल.मात्र दूरचे प्रवास करताना मनस्ताप होऊ शकतो.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील.भिन्न लिंगी व्यक्तीकडून योग्य साथ लाभेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवसभरात कामाचा उरक चांगला राहील. प्रवास घडतील. संध्याकाळ आनंदाची.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनाकलनीय व्यावसायिक निर्णय घ्याल. त्यातून नुकसान संभवते व्यसने टाळा.नवीन ओळखी होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पत्नीची उत्तम साथ लाभेल. मात्र इतरत्र आज फसवणूक होऊ शकते.नात्यातून वाईट अनुभव येऊ शकतात.संयम ठेवा.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा.संध्याकाळ नैराश्य वाढवणारी असू शकते.गृहकलह टाळा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक उन्नती होईल.मात्र कामाचा ताण जाणवेल.उष्णतेचा त्रास संभवतो.छोट्या प्रवासातून आर्थिक लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) काही गुश अनुभव येतील. घराण्याची प्रतिष्ठा सांभाळा. कुटुंबिक मतभेद चव्हाट्यावर आणू नका.
( कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
