ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
जेष्ठ शुक्ल सप्तमी/अष्टमी.ग्रीष्म ऋतू.शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ -सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०”वर्ज्य दिवस”
चंद्र नक्षत्र -मघा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव”या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे.मान सन्मान यावरून वाद होऊ शकतात.संततीची चिंता वाटेल.अध्यात्मिक लाभ होतील.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रतिष्ठेपायी वादविवाद संभवतात.कठोर बोलणे टाळा.अहंकार नको.दानधर्म कराल.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)आर्थिक लाभाचा दिवस आहे.कर्जे मंजूर होतील.आर्थिक तजवीज होईल.मन अस्वस्थ राहील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील.आर्थिक लाभ होतील.एखादी अप्रिय बातमी येऊ शकते.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उच्च शिक्षणासाठी परदेशी जाल.दूरचे प्रवास घडतील.मात्र त्यात काळजी घ्या.नोकरीत कटकटी संभवतात.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे.खर्चात वाढ होईल.दानधर्म कराल.व्यापारात घट.मानसिक त्रास जाणवेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. मन आनंदी राहील. वादविवाद आणि कोर्ट कामात यश मिळेल.आरोग्य मात्र सांभाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संतती कडून खुशखबर मिळेल. आर्थिक प्रगती होईल. भागीदारीत फसवणूक होऊ शकते. घरात कुरबुरी होऊ शकतात.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मुलांसाठी प्रवास करावा लागेल.मात्र प्रवासात त्रास.साक्षात्कार होईल.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) जमिनीची आणि राहत्या घराची कामे मार्गी लागतील.मात्र त्यासाठी खर्च आणि धावपळ वाढेल.पत्नीकडून सहकार्य मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) महत्वाची कागदपत्रे सापडतील.लेखकांना यश मिळेल.करार करण्यास अनुकूल दिवस आहे.पत्नीशी वाद होऊ शकतात.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) गृहसौख्य लाभेल.आर्थिक प्राप्ती होईल.तब्येतीची काळजी घ्या.जनसंपर्कातून त्रास होऊ शकतो.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
