ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक.
आषाढ अमावस्या. ग्रीष्म ऋतू.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज वर्ज्य दिवस,*दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या, दीप पूजन*
चंद्र नक्षत्र – पुनर्वसु.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवसायात वाढ होईल. येणी वसूल होतील. .
वृषभ:- गृहसौख्य लाभेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. मोजके बोला.
मिथुन:- आत्मविश्वास वाढेल. भौतिक सुखात कमतरता जाणवेल. अनपेक्षित लाभ होतील.
कर्क:- प्रतिकूल ग्रहमान आहे. शक्यतो महत्वाची कामे आज नकोत. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा.
सिंह:- अनुकूलता आहे. कामे मार्गी लावा. जेष्ठांकडून लाभ होतील.
कन्या:- कामाच्या ठिकाणी वादाचे प्रसंग येऊ शकतात. शक्यतो शांत रहा.संयम ठेवा. इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळा.
तुळ:- पत्नीकडून लाभ होतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. प्रवासात काळजी घ्या.
वृश्चिक:– मन अस्वस्थ करणारा दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.
धनु:- पत्नीशी किंवा जोडीदाराशी मतभेद संभवतात. संततीशी संवाद साधा.
मकर:- अनुकूल दिवस आहे. भरपूर मेहनत करा. फळ मिळेल. मात्र आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
कुंभ:- इष्ट देवतेची उपासना करा. प्रवासात चोरीचे भय आहे. पोटाचे विकार संभवतात.
मीन:- गृहकलह टाळा. पाळीव पशूंपासून काळजी घ्या. जमीन व्यवसायातून नुकसान संभवते.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)