मुंबई,दि.२३ जुलै २०२३ –मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर रात्री १०:३० च्या सुमारास दरड कोसळली असून मुंबई-पुण्याची वाहतूक ठप्प झाली आहे.दरड कोसळल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वर मौजे आडोशी गावचे हद्दीत जवळ मुंबई लाईनवर डोंगर भागातून दरड कोसळून मातीचा मोठा ढीग हा मुंबई बाजूच्या तिन्ही लेन वरती पडलेला आहे. मुंबई लेनवरील वाहतूक थांबलेली आहे. सदरचा मातीचा ढीग हा आय आर बी चे जेसीपी,डंपर च्या सहाय्याने काढून घेण्याचे काम चालू आहे. साधारणतः २० ते २५ डंपर डबर रोड मध्ये पडलेला आहे. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ उपस्थित असून मातीचा ढीग काढण्याचे काम सुरु आहे..
व्हिडिओ पहा