मुंबई,दि.३१ जुलै २०२३ –जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका रेल्वे पोलीस जवानानेच हा गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.यामध्ये आरपीएफच्याच एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह ३ प्रवाशांचा मृत्यू झालाय..
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरपीएफ जवान मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे.महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून पालघरचे अंतर सुमारे १०० किमी आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल चेतन कुमार चौधरी यांनी त्यांच्या एस्कॉर्ट ड्युटी इनचार्ज एएसआय टिका राम मीना यांना चालत्या ट्रेनमध्ये गोळ्या घातल्या. आपल्या सिनियरला गोळ्या घालल्यानंतर हवालदार दुसऱ्या बोगीत गेला आणि तीन प्रवाशांना गोळ्या घातल्या.यात चौघांचीही मृत्यू झाला आहे. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही.
#WATCH | Mumbai: DRM Neeraj Kumar says, "At around 6 am we got to know that an RPF constable, who was on escorting duty opened fire…Four people have been shot dead…Our railway officer reached the spot. The families have been contacted. Ex-gratia will be given." pic.twitter.com/Zl7FfoUd8i
— ANI (@ANI) July 31, 2023
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मीरा रोड आणि दहिसर दरम्यान ट्रेनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) त्याला पकडले आणि त्याचे शस्त्रही जप्त केले. बोरिवली रेल्वे स्थानकावरील रेल्वेतून मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की आरोपी आरपीएफ जवान सध्या मीरा रोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे.
Four people were shot dead in the firing incident inside the Jaipur Express train (12956). The accused has been arrested.
Visuals from Mumbai Central Railway Station pic.twitter.com/RgNjYOTbMD
— ANI (@ANI) July 31, 2023