आजचे राशिभविष्य शुक्रवार,४ ऑगस्ट २०२३  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक.

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक.
अधिक श्रावण कृष्ण चतुर्थी.वर्षा ऋतू,दक्षिणायन, शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस”*संकष्टी चतुर्थी.*(मुंबई चंद्रोदय रात्री ९.३१) 
चंद्र नक्षत्र -शततारका.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी -कुंभ. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शुभ दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. मन आनंदी राहील. शेअर्स टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) बढती/बदली चे योग येतील. कामाच्या ठिकाणी वजन वाढेल. अचानक लाभ होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मन प्रसन्न राहील. स्वप्न साकार होतील. भावंडांशी वाद नकोत.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीत सुखद अनुभव येतील. लॉटरी ची शक्यता आहे. कठोर बोलणे टाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कौटुंबिक सहल घडेल. दैवी साधना करण्यास उत्तम दिवस आहे. जोडीदाराशी मतभेद टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अचानक लाभ होतील. भूमिगत साधन संपत्ती कामातून फायदा होईल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यापारात लाभ होतील. जुनी गुंतवणूक कामास येईल. प्रतिष्ठा वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उन्नती कराल. मानसिक सौख्य लाभेल. कनिष्ठ कर्मचारी सहकार्य करतील. ऋणातून मुक्त व्हाल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. संतती बाबत खुश खबर मिळेल. शेअर्समधून लाभ.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वास्तूची कामे मार्गी लागतील. उधारी नको. प्रवासात काळजी घ्या. वाहन जपून चालवा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  महत्वाकांक्षा वाढीस लागेल. यश आणि कीर्ती लाभेल. कोर्ट काम आणि वादविवादात अपयश.शत्रू डोके वर काढतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र कालावधी आहे. आध्यात्मिक लाभ होतील. अपघाताचे भय आहे.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!