नाशिक जिल्हा व शहर परिसरात सलग २ दिवस वीज पुरवठा बंद

0

नाशिक, दि. ८ सप्टेंबर २०२३ – नाशिक शहर आणि जिल्ह्यातील रहिवाशांसाठी एक महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य विद्युत  पारेषण कंपनीने दिलेल्या माहिती नुसार, काही अत्यंत तातडीच्या मनोरा उभारणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील वीज  पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. महावितरण विभागाकडून सलग दोन दिवस म्हणजेच ९ आणि १० सप्टेंबर (शनिवार व रविवार) वीज पुरवठा  बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे आताच यासंदर्भातील नियोजन तुम्हाला करावे लागणार आहे.

वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास वीज  पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. किंवा वेळेत काम पूर्ण न झाल्यास वीजपुरवठा सुरू करण्यात विलंब होणार असल्याचे कंपनीने कळविले आहे

शनिवार, ९ सप्टेंबर २०२३… वेळ – सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत
सामनगाव, जेलरोड, आयएसपी, शिंदे. चांदोरी, भगूर, ठाणगाव, एमआयडीसी, वावी, नांदुरी, नायगाव, विजयनगर, सिन्नर, दापूर, सोनांबे, गोपूर, ओझर, टाऊनशिप, जऊळके, आंबे हिल, दहावा मैल. जानोरी, सिडको, अंबड, पाथर्डी, त्र्यंबकेश्वर, गुरणारे, चुंचाळे, वाडीवऱ्हे, नवदुर्गा, उपनगर, गणेशवाडी पंपिंग, मेरी, तेलवाणे, तपोवन, गणेशवाडी, गंगापूर, खंबाळे, मेरी, सातपूर, आडगाव, क्रिडा संकुल, मखमलाबाद, उमराळे, ननाशी, मुंगसरा, म्हसरुळ, पंपिंग, मेरी, म्हाळसाकोरे, करंजगाव, खेडगाव, सुकेणे, रामाचे पिंपळस, नैताळे, कोकणगाव, कुंदेवाडी, वणी, सुरगाणा, बोपेगगाव, कोशंबे, कोऱ्हाटे, तळेगाव.

रविवार, १० सप्टेंबर २०२३… वेळ – सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजपर्यंत
सामनगाव, जेलरोड, आयएसपी, शिंदे. चांदोरी, भगूर, ठाणगाव, एमआयडीसी, वावी, नांदुरी, नायगाव, विजयनगर, सिन्नर, दापूर, सोनांबे, गोपूर, ओझर, टाऊनशिप, जऊळके, आंबे हिल, दहावा मैल. जानोरी, सिडको, अंबड, पाथर्डी, त्र्यंबकेश्वर, गुरणारे, चुंचाळे, वाडीवऱ्हे, नवदुर्गा, उपनगर, गणेशवाडी पंपिंग, मेरी, तेलवाणे, तपोवन, गणेशवाडी, गंगापूर, खंबाळे, मेरी, सातपूर, आडगाव, क्रिडा संकुल, मखमलाबाद, उमराळे, ननाशी, मुंगसरा, म्हसरुळ, पंपिंग, मेरी, म्हाळसाकोरे, करंजगाव, खेडगाव, सुकेणे, रामाचे पिंपळस, नैताळे, कोकणगाव, कुंदेवाडी, वणी, सुरगाणा, बोपेगगाव, कोशंबे, कोऱ्हाटे, तळेगाव.

पर्यायी स्रोतांकडून वीज पुरवठा उपलब्ध करणार
दिनांक ०९ व १० सप्टेंबर २०२३ शनिवार व रविवार रोजी २२० के.व्ही. बाभळेश्वर आणि एकलहरे या डबल सर्किट अतिउच्चदाब वाहिनीवर मनोरा उभारणीचे कार्य महापारेषणच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यात विद्युतपुरवठा होत असलेल्या विविध भागात विद्युतपुरवठा बंद राहील असे जाहीर निवेदन महापारेषण कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. निवेदनात ज्या संभाव्य भागात विद्युत पुरवठा बंद राहील अशा ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता महापारेषणच्यावतीने पर्यायी स्रोतांकडून विजेची उपलब्धता करण्यात येणार आहे. मात्र पर्यायी व्यवस्थेमध्ये आकस्मिक काही तांत्रिक अडचण निर्माण झाली तरच वीज पुरवठा काही भागात काही कालावधीकरीता बंद राहू शकतो याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी असे महावितरणच्या नाशिक शहर मंडळ यांचेकडून कळविण्यात आले आहे.

Electricity supply off for 2 consecutive days in Nashik district and city area

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.