मुंबई,दि.२२ सप्टेंबर २०२३ – किरीट सोमय्या बातमी प्रकरणात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून लोकशाही वृत्तवाहिनीला नोटीस देण्यात आली. किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वृत्तवाहिनीला पुढील ७२ तास बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लोकशाही वृत्तवाहिनी आज संध्याकाळी ७ वाजल्यापासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले. याची माहिती लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी दिली आहे.
लोकशाही वृत्तवाहिनीला संध्याकाळी ६.१३ वाजता आदेश प्राप्त झाल्याची सांगण्यात आले आहे. वृत्तवाहिनीचे संपादक मंडळ सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत.अशी हि माहिती सुतार यांनी दिली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार, लोकशाही वाहिनीला शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून पुढील ७२ तास म्हणजेच सोमवारपर्यंत (२५ सप्टेंबर) बंद ठेवले जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे लोकशाही वृत्तवाहिनीकडून स्पष्ट करण्यात आले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कारवाईवर लोकशाही वृत्तवाहिनीने प्रतिक्रिया दिली.आमची बाजू ऐकून घेण्याची अपेक्षा होती.परंतु,आम्हाला थेट शिक्षा सुनावल्याचा एक प्रकार आहे. याप्रकरणी आम्ही कायदेशीररित्या लढू, असे लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार म्हटले आहे.
यापूर्वी किरीट सोमय्या यांच्यावरील अश्लील व्हिडिओची बातमी दाखवल्यानंतर काही तासांनी लोकशाही वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण अचानक बंद झाले होते.त्यावेळी कमलेश सुतार यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे लोकशाही वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण बंद झाल्याची माहिती दिली होती.प्रक्षेपण बंद झाल्यानंतर काही तासांत लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे लाईव्ह प्रसारण सुरू झाले होते.