बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायचे त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं:एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल 

0

मुंबई,दि.२४ ऑक्टोबर २०२३ – ज्यांना बाळासाहेबांनी नाकारलं त्यांचे तळवे तुम्ही चाटत आहात. बाळासाहेब ठाकरे ज्यांना गाडायची भाषा करायचे त्यांना तुम्ही डोक्यावर घेतले.असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईच्या आझाद मैदानात शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजीत केला आहे. या मेळ्याव्याला संबोधीत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होतेयावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी जमलेल्या शिवसैनिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

आज आपण एकीकडे बाळासाहेबांचे विचार पाहतोय आणि दुसरीकडे सत्तेसाठी लाचारी पाहतोय. बाळासाहेबांचे विचार हेच आमचे शिवतीर्थ आहे. मागच्या वेळी देखील मी शिवतीर्थावर मी दसरा मेळावा करु शकलो असतो, पण शांतता राहावी हा माझा उद्देश आहे. जिथे मोकळेपणाने विचार मांडता येतील तेच आपले शिवतीर्थ असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.शिवसेनेची काँग्रेस झाली तर दुकान बंद करेन असे बाळासाहेबांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तर आश्चर्य वाटायला नको आता जनताच ठरवेल ही महागद्दार काेण ? बाळासाहेब ठाकरेंच्‍या हिंदूत्‍वाचा गळा घाेटलेले तुम्‍हाला चालणार आहे का ? असे एकनाथ शिंदे म्हणाले

सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी आम्‍ही कधीच तडजाोड करणार नाही. रक्‍ताचा नाते सांगणार्‍यांनीच बाळासाहेबांच्‍या विचारांचा गळा घाेटला आहे केवळ सत्तेसाठी त्‍यांनी हिंदुत्त्‍वाच्‍या विचाराशी तडजाोड केली.मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचे सरकार आणले. पूर्वी तुम्‍ही सरकार पडणार असे म्‍हणत हाेता. आम्‍हाला विकासासाठी अजित पवार यांची साथ मिळाली. आम्‍हाला आता २०० हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. आता तुम्‍ही मुख्‍यमंत्री बदलणार असे दरराेज सांगता. मी कधीच पदासाठी काम करत नाही.असे ही शिंदे म्हणाले

काेणावरही अन्‍याय न करता मराठा आरक्षण टिकणारे आरक्षण देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेवून सांगताे कीु, माझ्‍या रक्‍तातील शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्‍न साेडवणारच. या प्रश्‍नी काेणीही टाेकाचे पाउल उचलू नका. हे सरकार तुमचे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्‍यमंत्री असतानाच मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र सर्वोच्‍च न्‍यायालयात ते टिकले नाही. आता आरक्षणाच्‍या नावाखाली जाती-जातींमध्‍ये तेढ निर्माण करण्‍याचे षडयंत्र सुरु असून ते हाणून पाडा.असे हि शिंदे यांनी सांगितले

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!