ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
कार्तिक शुक्ल प्रतिपदा. शरद ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज शुभ दिवस आहे.”*दिवाळी पाडवा,बलिप्रतिपदा,वहीपूजन*
नक्षत्र – अनुराधा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महिलांकडून लाभ होतील. वाहन सख्य लाभेल. मोठी खरेदी होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) स्पर्धेत यश मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. शत्रू पराभूत होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यवसायात उत्तम नफा होईल. दळणवळण व्यवसायातून लाभ होतील. मात्र प्रवासात काही अडचणींचा देखील सामना करावा लागेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कलाप्रांतात उत्तम कामगिरी कराल. लेखकांना यश मिळेल. दागिने घडतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शेती कामातून किंवा जमीन विक्रीतून लाभ होतील. गायकांना चांगला दिवस आहे. पत्नीशी मतभेद संभवतात.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक बाजू भक्कम होईल. व्यवसायात भरभराट होईल. लेखकांना चांगला दिवस आहे.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) बौद्धिक संपदा कामी येईल. सखोल संशोधन करण्याचा तुमचा स्वभाव असल्याने नवीन संधी प्राप्त होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मेजवानी चे आयोजन कराल. बौद्धिक खुराक मिळेल. सणाचा आनंद घ्याल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) ग्रहमान फारसे अनुकूल नाही. भ्रमंती होईल. नवीन खरेदी कराल. व्यक्त होताना काळजी घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत उत्तम दिवस आहे. लाभतील चंद्र – बुध युती भरभराट देतील. भौतिक सुखे लाभतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यवसाय वृद्धी साठी उत्तम दिवस आहे. कष्टाचे चीज होईल. स्त्रीधन वाढेल. दूरच्या प्रवासात त्रास संभवतो.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रणयरम्य दिवस आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आनंदी राहाल. पर्यटन कराल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
