युद्धविराम नाटकातून मांडली युद्धानंतरची भयावह परिस्थिती
६२ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा,नाशिक - प्रवीण यशवंत
बाबाज थियेटर नाशिक निर्मिती प्रशांत जुन्नरे नाटक – युद्धविराम लेखक अक्षय संत यांचं हे नाटक ६२ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सादर झाले अतिशय सुंदर सादरीकरण आणि राज्यनाट्य स्पर्धेला खऱ्याअर्थाने रंग भरण्यास सुरुवात झाली एवढ्या प्रभावीपणे हे नाटक सादर करण्यात आले.
हे नाटक बघताना रशिया,युक्रेन युद्धाचे बघितलेले व्हिडीओ,फोटो यांची आठवण स्मरण होते. ते व्हिडीओ फोटो अस्वस्थता निर्माण करता, फार भीषण होते ते लहान मुलांचे हाल,जखमा आणि त्यांचे मृत्यू हे मनाला पिळवटून टाकणारे होते.आणि तीच अवस्था स्त्री,पुरुषांची होती हे सर्व मनात घोळण्याचे कारण युद्धविराम या नाटकाचा विषय प्राचीन काळतील ट्रोजन आणि ग्रीक युद्ध याची गोष्ट सांगणारा होता नाटकात जे दृश्य वाक्य कानावर येतात ते याच काळात आपण सर्वांनी युक्रेन,रशिया बाबतीत बघितलय अनुभलंयतसंच हे नाटक बघताना अनुभवतो
यादोन काळातील अंतर,महाअंतर जरी असले तरी आजही आपल्याला ती परिस्थिती दिसते.ट्राय आणि ग्रीक युद्धे फार गुंतागुंतीच प्रकरण आहे हे मिथक, दंतकथा,म्हणूनही समोर येते आणी हे सत्य घडलेलं युद्ध म्हणूनही समोर येते,त्यामुळे याची थोडी मागची बाजू बघू
तसे ट्रोजन युद्ध ही युगानुयुगे चर्चा झालेली व्यापक ऐतिहासिक घटना आहे.जॉय ड्रायडेन, आलेक्झाडर पोप, लुइस मेकनेस अशा विविध कवींनी या आख्यायीकच भाषांतर करण्यात प्रचंड रस होता ट्रोजन युद्धाची गोष्ट सामान्यापासुन प्रतिभावंत साहित्यिकांच्या मनावर राज्य करित होती मिथक म्हणूनही तिचा विस्तार वाढत होता आणी सत्य घटना म्हणूनही तिचा विस्तार वाढत होता या गोष्टीने प्रचंड नेरेटर निर्माण केले आणी झाले.अत्यंत अतिउत्तम कथा हे ट्रोजन युद्धान सर्वांच लक्ष वेधन्याच, मनात खोलावर स्थान निर्माण करण्याच महत्वाच कारण होत आणी दीर्घकाळा पर्यंत सर्वांचा असा समज किंवा संशय होता की हे युद्ध खरच घडलं असाव.
ग्रीक इतिहासकार हेरोडॉट्स आणि ग्रीक गाणितज्ञ एराटो स्थेनीस यांचा दस्तऐवज पुराव्या निशी हे सांगतो की ट्रोजन युद्ध घडलेलं आहे ,ग्रीक कवी होमर यांच्या ‘इलियड’ या महाकाव्या नुसार ट्रोजन ग्रीक युद्ध सुमारे दहा वर्ष चालू होते प्राचीन ग्रीक यांचं नेतृत्व आगमेमनन यांनी तर ट्रोजनच नेतृत्व राजा बेरिंग यांनी केले होते इतिहासाचे जनक हेराडॉट्स यांनी सुमारे ८०० शे वर्षापूर्वी ट्रोजन युद्ध झाल्याचा उल्लेख केला आहे पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या. ग्रीक गणितज्ञ् एराटोस्थेनिस यांनी या युद्धाचा कालखंड ११८४असल्याचा उल्लेख केलाय
मात्र आधुनिक इतिहासकार अजूनही या युद्धाबद्दल साशंक आहे.आता हे युद्ध मिथक की सत्यलेखकाने कोणती भूमिका घेतलीय मिथक म्हणून नाटक लिहणार की सत्य म्हणून तर या दोनही भूमिका नाही. त्यांच्या संवेदनशिलतेला भावलेली गोष्ट ते मांडता.
“युद्धविराम नाटकाची गोष्ट”
राजा आगमेमनन आखिलंस ची मदत घेऊन ट्राय जिंकलं आणी ट्राय युवराज पॅरिस ने स्पार्टाची राणी हेलनला पळवून नेल आणि तिच्याशी लग्न केल हेलनाचा नवरा मेलेनॉसने आपला भाऊ राजा आगमेमनन ला विनंती केली की तिला सोडवून आणायचे.
हरेडॉट्स च्या मते हेलनच अपहरण नव्हतं झाल हेलनने मेलेनॉसला सोडून दिल होत ती आपल्या मर्जीने पॅरिस बरोबर गेली होती आगमेमनन तयार झाला आणी त्याने या मोहीमसाठी आखिलीस या योध्याला बरोबर घेतले पॅरिस चा भाऊ हेक्टर हा शूर होता त्याच्यात आणी आखिलीस मध्ये युद्ध झाले अशी ही साधारण गोष्टट्राय हे बंदिस्त शहर होत पूर्ण शहराच जाणू मोठा किल्ला होता आत जाण जवळपास अशक्यच होत अनेक दिवस महिने प्रयत्न करूनही आगमेमनन च्या सैन्याला आत जाता आल नाही मग अखिलिसने एक युक्ती केली त्याने एक मोठा लाकडी घोडा तयार केला त्या घोड्यात काही सैन्य लपून बसले हा घोडा रात्रच्या वेळी गुपचूप समुद्रा किनारी ठेवण्यात आला ट्राय च्या नागरिकांना वाटलं हा दैवी संकेत आहे जर हा घोडा आपण आत घेतला नाही तर देवता नाराज होतील त्यांनी हा घोडा आपल्या बंदिस्त शहरात नेला योग्य वेळ साधून सैनिक बाहेर पडले आणी त्यांनी कपट करून युद्ध केले या युद्धात पॅरिस ने बान मारला तो आखिलिसच्या टाचेत लागला आणी त्यामुळे त्याचा मृत्यू झाला ही गोष्ट आहे
प्रश्न हा आहे ही गोष्ट खरंच घडली की ही दंत कथा आहे …?
वरील गुंतागुंत आणी ट्राय व ग्रीक युद्धाची थोडक्यात गोष्ट .या प्रचंड बॅग्राउंड असलेल्या गोष्टीतून नाटककाराणे कुठे फोकस केलाय तर तो युद्ध कैदेत असलेल्या स्त्रियाच्या अवस्थेवर नाटक बोलत मिथक आणि सत्य या भानगडीत ना पडता इथे लेखक त्याला भावलेली बाजू दाखवतो इथे लेखकाची संवेदनशीलता प्रामुख्याने जाणवते.
दिग्दर्शन –
नाटकाचे दिग्दर्शन आरती प्रभू हिरे यांनी केले अतिशय अभ्यासपूर्वक,डिटेलिग, उत्तम असे दिग्दर्शन होते.अतिशय स्मुथ सादरीकरण,प्रत्येक सीन बांधलेला त्याचे लाईटींग,संगीत डॉयलॉग बोलत असलेला कलावंत हे सिंक्रो अप्रतिम होत.सुरुवाती पासून शेवटा पर्यंत अतिशय प्रामाणिक सादरीकरण ही नाटकाची जमेची बाजू होती.
प्रकाश योजना –
रवी राहणे यांची प्रकाश योजन मोकळ्या रंगमंचावर वेगवेगळी पात्र आणी त्याच स्थळ,काळ, प्रकाशाच्या माध्यमातून अप्रतिम क्रियेट करणारे रवी राहाने त्यांचा अनुभव त्याही पेक्षा मोठा आहे नाटकाच्या आशयाला जिवंत करणारी प्रकाश योजना ही नाटकाची दुसरी जमेची बाजू.
संगीत संयोजन –
रोहित सरोदे नाटकातील कपट कारस्थानाचे परिणाम,भेदकता,क्रूरता, प्रत्येक श्वासागनिक समोरून येणारी आक्रमकता यासर्वांचा जो परिणाम प्रेक्षकांनी अनुभला तो रोहित सरोदे च्या संगीत संयोजना मुळे, खूप छान आणी परिणाम कारक संगीत संयोजन.
नेपथ्य –
वरूण भोईर यांचं नेपथ्य खूप बोलक होत त्यात वापरलेली पिलर्स त्याचे कलर लेव्हलचा योग्य वापर ऑडियन्स लेफ्टला पडलेला सिंह उत्तम सूचकता हे नाटकासाठी महत्वाचा परिणाम साधत होते.
वेशभूषा –
कला द डिझायनरचकचकित पात्रांचे ड्रेस उध्वस्त ट्रायचे युद्धकैदी महाराणी आणी इतर यांच्या आतील अवस्था आणी त्यातून जानवणारी शोकांतिका आणि हे चकचकित ड्रेस नाटकाच्या गोष्टीच उत्तम वातावरण निर्मिती करत होते.
रंगभूषा –
माणिक कानडे यांची रंगभूषा खूपच सुंदर होती लेखकाच प्रत्येक पात्र योग्य त्या रंभूषेत उत्तम काम करत होते.
कलावंत-
महाराणी यांची भूमिका करणारी कलावंत लक्ष्मी गाडेकर यांनी चोख भूमिका केलीय खरंतर ट्रॉय ग्रीक युद्धातील जो भाग नाटकात होता त्याचा केंद्रबिंदू महाराणी हेच पात्र होत जे अभ्यासपूर्वक सादर केल.समजून उमजून केलेला अभिनय आणी त्यातून निर्माण झालेला परिणाम ही महत्वाची जमेची बाजू होती.
निशाद वाघ स्टेजवर पात्राच्या वेश वेशभूषात योग्य परिणाम साधत होता पण आपले वाक्य बोलताना एका लढवय्या चा जो आवेश आवाज असतो आणि बॉडी लेग्वेज ती फारच सामान्य होती जी त्यापात्रासाठी योग्य नव्हती पण महाराणीचे पात्राने तो सीन बॅलेन्स केला.
कविता आहेर,गीतांजली घोरपडे,आर्या प्रशांत,अनुजा ओढेकर ,पायल साळवे,रूपाली भोले,रसिका दाणी,खुशी पवार,माहिता आहेर,माणसी धर्वे,प्रशांत साठे,अभय सूर्यवंशी,श्रीकांतत् वाखारकर,नंदकुमार देशपांडे,अतुल धर्वे या सर्व कलावंतानीं खूपच सूंदर काम केले ह्या टीमवर्क शिवाय झालेल उत्तम सादरीकरण शक्यच नव्हते
प्रवीण यशवंत
मोबाईल -७७६७८९४३५
