लेखक – महेंद्र तेरेदेसाई
दिग्दर्शक – राजेश टाकेकर
नम्रता कलाविष्कार बहुुद्देशीय संस्थेचे’मुंबई मान्सून’ हे नाटक सादर झाले.
पिता,पुत्र यांची गोष्ट नाटक सांगते वडिलांचा घटस्फोट झालाय ते आपल्या मुलाबरोबर आयुष्याची सुरुवात करता पण भूतकाळातील घडलेली घटनेचा त्या पिता,पुत्र दोघांनवरही झालेला परिणाम त्यांच्या जगण्यात दिसतो ती परिस्थिती दोघां पिता पुत्राच नात घट्ट करत असते परिस्थिती माणसाला घडवते तशी माणूसही परिस्थिती घडवतो याचा प्रत्यय नाटकात दिसतो.पिता पुत्र यांच्या आयुष्यात एक घटना आकार घेऊ पाहतीये ती म्हणजे मुलाची एक मैत्रीण ही मैत्रीण दोघांनाही मनाच्या पातळीवर न कळत कनेक्ट होतेय
ती तशी मोकळ्या विचारांची आजच्या काळातील मुलगी आहे, स्वतंत्र विचाराची आहे,तिची मत आहेत,विचार आहे. मुलाच्या या मैत्रिणीमुळे पिता,पुत्र यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळते ते त्यांच जगणच हादरवून टाकत. इथे मुलाच त्या मैत्रिणीवर प्रेम होत आणि मैत्रिणीच मुलाच्या वडिलांवर प्रेम होते.नाटक या नात्याची गोष्ट सांगते,मैत्रीणीला मुलाच्या वडिलांशी लग्न करायचे आहे त्याला वडील नकार देता. मुलगाही मैत्रणीला म्हणतो तु माझ्याशी नाही माझ्या वडि लांबरोबरच तु लग्न कर आज पर्यंत त्यांनी खूप सोसलय. मैत्रीण म्हणते मी कुणाशी लग्न करायचं याच स्वातंत्र आहे मला,मी तुम्हा दोघांनाही मी कुणाशी लग्न करू हे ठरवू देणार नाही ! ते समोर असलेले प्रेक्षक ठरवतील मी लग्न तुम्हा दोघांपैकी कोणाबरोबर करायचे. लेखक चालू सामाजिक रचनेला छेद देऊ बघतोय ?
की माणवी विचार स्वातंत्राचा पुरस्कर्ता.?”मुंबई मान्सून” या नाटकात लेखक गोष्ट सांगताना पावसाचे जे रुपक त्यांनी मांडलेय धो धो पाऊस आणी मानवी भावभावनांचा वेग याची अप्रतिम सांगड लेखक महेंद्र तेरेदेसाई दाखवतात.
दिग्दर्शक राजेश टाकेकर यांनी पात्र साकारणाऱ्या कलावतांची उत्तम निवड केलीय त्यांच फ्रेमिंग,ब्लॉकिंग,विषयानुरूप प्रत्येक दृश्य उत्तम सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न साध्य होतो. त्यांनी नाटक कुठे शब्दबंबाळ होऊ दिले नाही प्रत्येक दृश्याचा मंचावरील सादरीकरणाचा वेग किती हवा किती नाही याच उत्तम भान दिग्दर्शकाला होते.मुलाची भूमिका करणाऱ्या कलावंता वर काम केले पाहिजे होत्ते. apprienace wise करेक्ट निवड दिग्दर्शक राजेश टाकेकर यांची.
नेपथ्य हरीकृष्ण डीडवाणी यांनी केलंय अतिशय चकचकित विषय आशयाला साजेसे असे नेपथ्य केलंय.
प्रकाश योजना विनोद राठोड यांनी विषयानुरूप केलीय.
संगीत संयोजन विक्रम गवांदे यांनी केलंय.
वेशभूषा डॉ सोनाली गायकवाड यांनी उत्तम साकारलीय
रंगभूषा माणिक कानडे यांनी केलीय.
ओम ची भूमिका करणारे कुणाल घोटेकर यांनी आपल्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला स्वताहावर पात्र म्हणून काम केले पाहिजे समजून घेतले पाहिजे अस वाटत.अद्वैत ची भूमिका करणारे सुयोग कुलकर्णी हे नाटकातील केंद्रबिंदू पात्र आहे यांनी उत्तम वडील,बाप,मित्रबाप उभा केलाय convincing बाप साकारलाय सुयोग कुलकर्णी उत्तम. ही नाटकासाठी जमेची बाजू आहे.
वैदेही ची भूमिका साकारलीय सृष्टी शिरवाडकर यांनी आजच्या काळातील विचार स्वातंत्र,मत, असणारी एक आत्मविश्वास असलेली वैदेही हे पात्र सृष्टी शिरवाडकर यांनी प्रभावी उभे केले आहे.स्टेज वरचा त्यांचा वावर इतका सहज होता जो वैदेही या पात्रा साठी महत्वाचा होता तो सृष्टी शिरवाडकर यांनी उत्तम साधलाय.
कलावंत – सुयोग कुलकर्णी,कुणाल घोटेकर,सृष्टी शिरवाडकर
निर्मिती सूत्रधार – श्री रवींद्र ढवळे
लेखक- महेंद्र तेरेदेसाई
दिग्दर्शक – राजेश टाकेकर
नेपथ्य – हरीकृष्ण डीडवाणी
संगीत संयोजन – विक्रम गवांदे
प्रकाश योजना – विनोद राठोड
वेशभूषा – डॉ सोनाली गायकवाड
रंगभूषा – माणिक कानडे
विशेष आभार – नंदकुमार देशपांडे,अरुण भावसार,बापू कुलकर्णी,वैशाली इंगळे व निरामय जेष्ठ नागरिक संघ डीजीपी नगर.
प्रवीण यशवंत
मोबाईल – ७७६७८९४४३५
( टिप – दि. २ व ३ डिसेंबर या दिवशी नाटक नाही सोमवारी दि ४ डिसेंबर ला ‘धर्ममाया’ नाशिक जिल्हा आहेर सुवर्णकार या संस्थेचे नाटक सादर होईल)
