नाशिक जिल्हा आहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्था नाशिक या संस्थेचे “धर्ममाया” हे नाटक स्पर्धेत सादर झाले.
नाटकाच्या गोष्टीत धर्मगुरू आचार्य महानंद राजपुत्राच्या राज्याभिषेक करण्यास नकार देता कारण तो राजपूत्र हा दत्तक घेतलेला राजपुत्र असतो,आणि नाचणाऱ्या एका स्त्रीत त्याचे मन गुंतलेले असते,राजाला संतती नसते अशा अनेक प्रश्नांचा हा एक मोठा प्रश्न राज दराबरात असतो.
पुढे धर्मगुरूंचा विश्वासू शिष्य दयानंद आणी राजदरबारातील महामंत्री या प्रश्नात महत्वाची भूमिका निभावता,धर्मगुरू महानंदाच्या या भूमिकेमुळे युवराज त्यांच्यावर तलवार उगारता,हा आचार्य महानंदांचा एक प्रकारे अपमानच करता युवराज. त्यामुळे धर्मगुरू संतापता, दुःखावता ,नाराज होता आणि प्रजेतील राजपूत्राच्या विरोधातील लोकांना एकत्र करून त्यांचे प्रश्न घेऊन उदा.भूदासाच्या जमिनीचा कळीचा प्रश्न घेऊन आचार्य महानंद राजपूत्र आणी राजसत्तेच्या विरोधात आंदोलन उभे करतो राजसत्तेला आव्हान देता, दरबारातील महामंत्री हे आचार्य महानंदाच्या शिष्यालाच फोडता त्याला आमिष देता की राज्यातील,राजदरबारातील पुढचा धर्मगुरू तुच असशील शिष्य दयानंद आणि महामंत्री एकत्र येऊन राजमातेच्या मार्गदर्शनाने आणी शिष्य दयानंदाच्या युक्तीने धर्मगुरू आचार्य महानंदाना जिवंत समाधी घ्यावी लागती अशी परिस्थिती शिष्य दयानंद आणि महामंत्री यांनी निर्माण केलेली असते, पुढे शिष्य दयानंद हा धर्मगुरू म्हणून राजदरबारात राजमाता घोषित करताता धर्मगुरु झालेला शिष्य दयानंद पुढे दत्तक पुत्र असलेल्या राजपुत्राच्या राज्याभिषेकाची घोषणा करतात. मोह,लोभ,अहंकार,द्वेष आणी कपटी राजकारण नाटकातून अप्रतिम मांडलय राजेंद्र पोळ यांनी. लेखकाने.”धर्ममाया ” हे नाटक राजसत्ता आणी धर्मसत्ता हा संघर्ष दाखवते.सत्य,न्याय,सचोटीने चालणारी धर्मसत्ता त्याचे कार्य आणी राजसत्तेची अडचण राज सत्तेतील महामंत्री आणि धर्मसत्तेतील फितूर मोठे षडयंत्र रचून धर्मसत्तेची कोंडी करून बिमोड करतात राज सत्ताधीश कसे धूर्तपणा,हुशारी,कटकारस्थान आखतात आणी यशस्वी होतात ही नाटकाची गोष्ट प्रभावी सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्नसर्व टीमचा जाणवतो.
दिग्दर्शन अविनाश वाघ यांनी केलंय दिग्दर्शनाला भरपूर वाव असलेली ही नाट्य सहिंता असताना दिग्दर्शक कमी पडतो नाटकाच्या दिग्दर्शनात.नाटकाच अतिशय आशयदृष्ट्या प्रभावी सादरीकरण होऊ शकते त्याला दिग्दर्शकाची उत्तम जोड हवी याचा नाट्या दिग्दर्शकाने विचार करावा.
नेपथ्य अविनाश वाघ यांनी केलंय कितीतरी प्रसंग असे होते जिथे कमी बजेट मध्ये सजेस्टिव नेपथ्य करता आले असते जे नाटकातील प्रसंग आशय दृष्ट्या उत्तम करता आले असते आणि परिणाम कारक दृश्य नेपथ्यकाराला मिळाले असते.
प्रकाश योजना ललित श्रीवास्तव यांनी नाटकाला अनुरूप अशी केलीय.पार्श्वासंगीत संगीत रोहन वाघ यांनी अतिशय त्यांनी साथदिलीय वाद्यवृदांमध्ये सतार नीलिमा कुलकर्णी ,तबला सुमेध इटनारे ,बासरी रोहन वाघ यांनी live संगीत केलंय त्याने नाटकाच्या दृश्यांना जिवंत केले परिणाम कारक असे संगीत केलंय या सर्वांनी ही नाटकाची जमेची बाजू होती.
वेशभूषा रिया वाघ यांनी केली जी नाटकाच्या विषयानुरूप होती,फ्रेश होती,
रंगाभूषा नाना जाधव यांनी अप्रतिम रंगभूषा आणि केशभूषा केलीय काम करताना पात्राना त्याची उत्तम मदत झाली असेल असे नाटक बघताना जाणवते.
आचार्य महानंद ही भूमिका केलीय विकास पालखेडकर.यांनी उत्तम असा अभिनय केलाय त्यांनी वाचिक ,आंगिक उत्तम काम केलंय पण त्यांची वेशभूषा,केशभूषा,त्यांची एनर्जी,प्रत्येक प्रेवेशातील त्यांच काम या गडबडीत एका प्रवेशात त्यांचा चष्मा तसाच डोळ्यांवर असताना त्यांनी एंट्री घेतली लक्षात येताच नकळत त्यांनी तो काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यांचा पण नाटकातील त्यांचा अभिनय सगळा परफॉर्मन्स अप्रतिम होता.
महामंत्री यांची भूमिका केलीय योगेश्वर थोरात यांनी नाटकातील त्यांच पात्र त्यांना नीट उमजलं आणि
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
धूर्त महामंत्री आणि राजमाता यांचा प्रामाणिक महामंत्री हे वेगळेपण आपल्या अभिनयातून उत्तम साकारलय.
युवराज ची भूमिका केलीय ओम जाधव यांनी नाटकाला अनुरूप पात्र साकारलंय.शिष्य दयानंद ही भूमिका अविनाश वाघ यांनी साकारलीय अतिशय अभ्यासू अस त्यांच काम,अभिनय होता.
राजमाता ही भूमिका उज्वला पाटील यांनी साकारलीय
यातील कलावंत समीक्षा कापडणे,उज्वला पाटील,मिनाक्षी परदेशी,अमोल आहिरारावं,मनोज जानोरकर, योगेश्वर थोरात, निर्मिती व्यवस्था प्रकाश थोरात,शशिकांत आहिररावं,संतोष सोनार,महेश घोडके,विशेष सहकार्य श्रीकांत बेणी,वैभव वाघ.
प्रवीण यशवंत
मोबाईल – ७७६७८९४४३५
