नाट्य भारती इंदौर या संस्थेने ” रा+धा =” हे नाटक स्पर्धेत सादर केले.रवींद्र दामोदर लाखे यांच्या कथेवर आधारित रा+धा= हे नाटक श्रीराम जोग यांनी लिहलंयनाटकाची सुरुवात निवेदक करतो त्या नंतर प्रथम दृश्य सुरु होते तिथे घनश्याम नावाचे सद्ग्रहस्थ वय वर्ष सत्तरच्या पूढे प्रचंड वाढलेली दाढी आणि त्यांना भेटायला आलेल्या राधा नावाची एक स्त्री आपल्याला दिसते ती सांगतीय की बाहेर लावलेला बोर्डवर लिहलंय इंग्रजी,मराठी,हिंदी पुस्तक वाचन्यासाठी स्त्री वा पुरुष पाहिजे योग्य पगार वा मानधन दिले जाईल त्यासाठी मी आलेय.ही नाटकाची उत्कंठा निर्माण करणारी सुरुवात.
रवींद्र लाखे यांच्या मुक्ती या कथेतील नाट्याची अतिशय प्रभावी पणे मांडणी श्रीराम जोग यांनी केलीय नाटकातील घन:श्याम परिस्थिती नुसार सतत बदल घडवू शकत नाही हा प्रतिष्ठित आणि प्रसिध्द असलेला गणितज्ञ गणिताची प्रमेय सोडविण्यात इतका गुंग असतो की आयुष्यातील नाती आणि व्यवहारातील गणित काही त्याला सोडवता येत नाही तासंतास, दिवसांनदिवस गणितात हरवल्यामुळे एक दिवस त्याचे सर्व कुटुंबं त्याला सोडून निघून जाते.
जेव्हा हा गणितज्ञ शुद्धीवर येतो तो पर्यत सर्व नाती संपलेली असतात. आता घनशाम आपल जगणच बदलू पाहतोय तो घराच्या बाहेर जाणच सोडतो,गणिताचा ग सुद्धा काढत नाही संपूर्ण वेळ फक्त पुस्तक वाचण्यात घालवतो जे कृष्ण मूर्ती,आईंस्टाईन आवांतर वाचन हा घनश्यामच्या जगण्याचा भागच होऊन बसतो.अश्या या परिस्थितीत घनश्यामच्या आयुष्यात राधाचा प्रवेश होतो दोघे बोलू लागता,काही समजू पाहाता,सांगू पाहता दोघेही एकमेकात वेगवेगळं नातं शोधू पाहता. कुठल्याही passion ला समर्पण हव,वेडपण हव हे वेडेपण म्हणजे नाटकातील घनश्याम. आयुष्य जगन आणी आयुष्यातून मुक्त होण काय ? ही नाटकाची गोष्ट राधा व घनश्याम ही पात्र सांगता.
श्रीराम जोग यांनी “मुक्ती”या कथेतील हेरलेलं नाट्य आणि त्याचे अतिशय संवेदनशील पणे केलेले नाट्यरूपांतर अप्रतिम आहे. दिग्दर्शन श्रीराम जोग यांच आहे.नाटकातील केंद्रबिंदू पात्र राधा आहे नाटकाचे नाव ‘राधा’ आहे पण ती प्रभावीपणे प्रेक्षकांच्या समोर येत नाही राधाचे बरेच दृश्य निवेदक पुढे घेऊन जातो, राधाचे बरेच दृश्य तुकड्यात समोर येतात इथे बघणारा प्रेक्षक ब्रेक होतो. नाटक संपताना मुख्य केंद्रबिंदू हा घनश्याम होतो.ते घनश्याम चे नाटक होऊन जाते,जो नाटकातील द्वितीय क्रमांक असलेलं महत्वाच पात्र आहे.आणि केंद्रबिंदू राधा आहे… रा+धा=… लेखक,दिग्दर्शक यांनी हा विचार करावा.
निवेदक नसला तर उत्तम लेखक दिग्दर्शक यांनी हा विचार करावा असे जाणवते. श्रीराम जोग हे नाटकाचे स्वता लेखक आणि दिग्दर्शक असल्याने संपूर्ण नाटकच एक प्रभाव सोडून जाते प्रत्येक दृश्यातील पात्र त्यांच बोलणं ,संगीत,प्रकाश,स्थळ,काळ याचा प्रेक्षकात होणारा परिणाम याचं दिग्दर्शकाला प्रचंड भान असाव असे जाणवते.सादर होणाऱ्या कुठल्याही संपूर्ण नाटकाचा आपण जे सांगू पाहतोय त्याच अपेक्षित परिणाम साधाला गेला की नाही हे जान भान असलेला दिग्दर्शकीय नाटक म्हणजे “रा+धा=”…
प्रकाश योजना अभिजित कळमकर यांनी केलीय मंचावर सादर होणाऱ्या प्रत्येक दृश्यांचे उत्तम लाईटचे डिझाईन,दृश्याला अनुरूप वातावरण निर्मिती,नाटकातील स्थळ काळ उत्तम प्रकाश निर्मितीतून विषयानुरूप परिणाम साधलाय ही नाटकाची जमेची बाजू होती.
संगीत संयोजन शशिकांत किरकीरे यांनी केले नाटकाच्या विषयाला साजेसे परिणामकारक असे संगीत संयोजन होते.
नेपथ्य अनिरुद्ध किरकीरे यांनी केले घनशाम या पात्राचा आयुष्याच्या भूत,वर्तमान याचा प्रभाव असणारे घराचे नेपथ्य अतिशय अपिलिंग असे साकारले.विंग टू विंग अर्धवर्तुळाकार वापरलेल्या लेव्हल त्यात क्रियेट केलेलि घरातील वेगवेगळ्या जागा,फ्रेमवरील शून्य,गणितालील अंक,चिन्ह हे सर्व उत्कृष्ट असे नाटकात वातावरण निर्मिती करत होते.
रंगभूषा दिलीप दाते यांनी केली नाटकाला अनुरूप अशी रंगाभूषा होती.
वेशभूषा प्रांजली सरवटे यांनी केली विचारपूर्वक अशी वेशभूषा होती विशेषता घनश्याम ची वेशभूषा.
घनश्याम ची भूमिका करणारे श्रीराम जोग यांनी घनशामची भूतकाळातील स्थितीचा त्यांच्या वर्तमानातील जगण्यातले वर्तन,कृती,वाचिक अभिनय,कायिक अभिनय अप्रतिम साकारलाय संपूर्ण नाटकात त्यांनी प्रभावी काम केले थोडक्यात नाटकातील मुख्य केंद्रबिंदू अशी त्याची छाप पडली.
राधा या पात्राचा रोल केलाय तो श्रुतिका (जोग) कळमकर यांनी.त्यांच पात्र हे नाटकातील मुख्य केंद्र बिंदू आहे पण ते प्रभावी वाटत नव्हते मंचावरील आपल्या कोऍक्टर बरोबर convince होणे व करणे तसेच प्रेक्षकांना बरोबरचे conviceing इथे लक्ष देणे गरजेचे वाटते.बाकी उत्तम समजून केलेली भूमिका विषयाला अनुरूप होती,वाचिक अभिनय हा प्रभावी होता आशयाच्या दृष्टीने परिणाम कारक दोघे.
सातपुते श्रीरंग डिडोळकर यांनी अप्रतिम साकारलाय नाट म्हणून मी काम करतोय स्टेजवर अस कुठेच जाणवत नाही इतका सहज अभिनय,स्टेजवरचा वावर होता.
चैतन्य भूमिका केलीय दिलीप लोकरे यांनी नयन ची भूमिका केलीय अनंत मुंगी यांनी सुमी ची भूमिका केलीय प्रतीक्षा बेलसरे यांनी बँक मॅनेजर ची भूमिका केलीय लोकेश निमगावकर यांनी.बँक क्लार्क ची भूमिका केलीय प्रांजली सरावटे यांनी.या सर्व कलावंतांनी नाटकात उत्तम असा विषयानुरूप अभिनय केला.
लेखक,दिग्दर्शक -श्रीराम जोग
प्रकाश – योजना अभिजित कळमकर.
संगीत – संयोजन शशिकांत किरकीरे
नेपथ्य – अनिरुद्ध किरकीरे
वेशभूषा – प्रांजली सरवटे
रंगभुषा – दीपाली दाते
व्यवस्थापक – गजानन राजापूरकर
विशेष आभार – माणिक कानडे.
प्रवीण यशवंत
मोबाईल – ७७६७८९४४३५
