आजचे राशिभविष्य मंगळवार,९ जानेवारी २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी.हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज त्रयोदशी वर्ज्य दिवस” *भौमप्रदोष, शिवरात्री*
नक्षत्र – ज्येष्ठ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक/धनु.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक लाभाचा दिवस आहे. खर्च होईल मात्र तो योग्य कारणासाठी होईल. संध्याकाळ विश्रांतीची.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नवीन ओळखी होतील. जोड धंदा सुरू करायचे प्रस्ताव येतील. त्यात यश मिळेल. विनाकारण खर्च वाढेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक दृष्टीने अनुकल दिवस आहे. कामे पूर्ण करा. संध्याकाळ मेजवानीची.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) काही नवीन प्रश्न निर्माण होतील. मात्र जुन्या समस्या सुटतील. संध्याकाळ नंतर अनुकूलता वाढेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) राजकीय यश लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासात लाभ होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यावसायिक दृष्टीने लाभदायक दिवस आहे. संभाव्य संकट टळेल. श्री. शंकराची उपासना करा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अप्राप्य गोष्टी प्राप्त होतील. संशोधन कार्यात यश लाभेल. सन्मान मिळतील. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रगतीची दारे खुली झाली आहेत. कामाचा वेग वाढेल. उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाची सुरुवात संथ पणे झाली तरी नंतर कामाचा वेग वाढेल. संध्याकाळ अनुकूल आहे.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कामातील सातत्य आणि शांतपणे घेतलेले निर्णय याचा तुम्हाला विलक्षण लाभ होईल. वक्तृत्व चमकेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नेहमीची कामे चालू ठेवणे आवश्यक आहे. वेळ दवडू नका. अनुकूल रवी – हर्षल शुभ योग अचानक संधी उपलब्ध करून देईन.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) स्थावर संपत्तीचे प्रश्न सुटण्यासाठी चांगला कालावधी आहे. प्रशासकीय कामे मार्गी लागतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!