ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
मार्गशीर्ष अमावस्या. हेमंत ऋतू. शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज अमावस्या वर्ज्य दिन” *दर्श- वेळा अमावस्या*
चंद्र नक्षत्र – पूर्वाषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -धनु/मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमच्या नवम स्थानी अमावस्या आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम दिवस आहे. गूढ उलगडतील. प्रवास टाळावेत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रतिकूल दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. तब्येतीची काळजी घ्यावी. नैतिकता पाळावी.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) विनाकारण वैमनस्य घेऊ नये. राजकीय क्षेत्रात जपून पावले टाकावीत. सामाजिक कार्यातून लाभ.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) व्यावसायिक संकेत पाळावेत. मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. चोरीचे भय आहे. नोकरीत सुखद घटना घडतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अंदाजाने कामे करू नयेत. शेअर्स मध्ये नुकसान संभवते. जेष्ठ व्यक्तीची चिंता लागून राहील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) वास्तू दोषाचे निराकरण करावे. मानसिक त्रास संभवतो. सामाजिक असंतोष जाणवेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पूर्व कर्माची फळे मिळतील. अमानाचे प्रसंग येऊ शकतात. व्यक्त होताना काळजी घ्यावी.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कधी कधी माणूस वाहवत जातो. आज परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक प्रश्न जपून हाताळावेत.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्याच राशीत अमावस्या आहे. ग्रहमान आध्यात्मिक उन्नती साठी पोषक आहे. दानधर्म करावा. मनःशांती ढळू देऊ नये.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रतिकूल दिवस आहे. व्यय स्थानी रवी -चंद्र युती आहे. विनाकारण अहंकार बाळगू नये. राजकीय अपयश संभवते.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. अनुकूल रवी चंद्र मन उपाशी ठेवतील. जुनी अडलेली कामे मार्गी लागतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र हर्षल शुभ योग आहे. अनुकुलता वाढत आहे. प्रगती साध्य होईल. नोकरीत तणाव जाणवेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)