ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
पौष शुक्ल सप्तमी. हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज शुभ दिवस आहे”नक्षत्र – रेवती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चैनीवर खर्च कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. पत्नीकडून लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम दिवस आहे. कल्पनेला धुमारे फुटतील. प्रेमात यश मिळेल. जोडीदार खुश राहील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरीत सुखद घटना घडतील. मन प्रसन्न राहील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पंचमात शुक्र, नवम स्थानी चंद्र अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. कामाचा वेग वाढेल. आनंदी राहाल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. वाहन सुख लाभेल. बाग – बगीचा येथे फिरणे होईल. पाण्यापासून काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) एकाच वेळी अनेक व्यवसाय करणे शक्य होईल. जोड व्यवसाय सुरू कराल. नात्यातील महिलांकडून लाभ होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कला, संशोधन यात उत्तम कामगिरी कराल. व्यवसाय वृद्धी होईल. दागिने खरेदी होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) भौतिक सुखांची रेलचेल राहील. प्रणय रम्य दिवस आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आवडते छंद जोपासाल. घरगुती मैफिल घडेल. मित्र मैत्रिणी भेटतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. मौल्यवान वस्तू चा लाभ मिळेल. दिवस आनंदात व्यतीत कराल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यावसायिक यश लाभेल. उत्साह वाढेल. कर्माचे यथायोग्य फळ मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नवम स्थानी शुक्र आहे. जल पर्यटन घडेल. दूरचे प्रवास होतील. दैवी घटना घडतील.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)