आजचे राशिभविष्य,सोमवार,१९ फेब्रुवारी २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
माघ शुक्ल दशमी/एकादशी शिशिर. ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – मृग/आर्द्रा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
“आज चांगला दिवस आहे.” छत्रपती शिवाजी महाराज जयंती
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- आर्थिक दृष्टीने अत्यंत उत्तम दिवस आहे. अनुकूल रवी, शनी स्वप्नपूर्ती करतील. व्यापारात यश.

वृषभ:- उत्तम दिवस आहे. उदंड व्यावसायिक यश मिळेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. सन्मान मिळतील.

मिथुन:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. दीर्घकालीन लाभ होणाऱ्या घटना घडतील. जेष्ठांचे आशीर्वाद लाभतील. मन आनंदी राहील.

कर्क:- संमिश्र दिवस आहे. अनुकूल चंद्र राहूच्या नक्षत्रात आहे. मित्र मंडळींची भेट होईल. तुमच्यापासून इतरांना लाभ होईल.

सिंह:-  निकोप स्पर्धेचा अनुभव येईल. भयाचे सावट दूर होईल. नोकरी/व्यवसायात प्रगती होईल. शत्रू माघार घेतील.

कन्या:-नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अधिकारात वाढ होईल. भागीदारी व्यवसायात उत्तम यश लाभेल.

तुळ:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. प्रिय व्यक्तीकडून प्रतिसाद मिळेल. आज केलेली उपासना लवकर फळाला येईल. सिद्धी प्राप्त होतील.

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कारखान्यात नवीन बदल कराल. उत्साही वाटेल. कार्यक्षमता वाढेल.

धनु:- तुमचा दबदबा वाढवणारा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. वादविवाद मिटतील. हातून मोठे काम घडेल.

मकर:- कर्तृत्व गाजवण्याचा दिवस आहे. मौजमस्ती कराल. जीवनाचा आनंद घ्याल. शंका दूर होतील.

कुंभ:– स्व राशीतील रवी, शनी आणि त्यांचा चंद्राशी लाभ योग उत्तम कार्यपूर्ती करणारा आहे. महत्वाचे निर्णय आज जरूर घ्या. योग्य मार्गदर्शन मिळेल.

मीन:- संमिश्र दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न सुटतील. योग्य औषध योजना होईल. मातृभूमीची सेवा कराल. एखादी पदवी प्राप्त होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.