आजचे राशिभविष्य,बुधवार,२८ फेब्रुवारी २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ कृष्ण चतुर्थी. शिशिर ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज शुभ दिवस आहे” *संकष्टी चतुर्थी*चंद्रोदय मुंबई -रात्री ९.४९,नाशिक -९.४५, पुणे -९.४४.
नक्षत्र – हस्त/चित्रा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या/तुळ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकल रवी, बुध, शनी असे अत्यंत उच्च ग्रहमान आहे. याचा लाभ घ्या. वेळ दवडू नका. गुप्त शत्रूंचा नाश होईल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नोकरीत मनासारखे बदल घडतील. वरिष्ठ खुश राहतील. स्थान बदल दर्शवत आहे. प्रेमात पडाल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नवम स्थानी मोठ्या घडामोडी घडत आहेत. परदेश गमनाचे योग येतील. उच्च स्थानी जाल. आर्थिक निधी वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक बाजू बळकट होईल. गुप्तधन मिळण्याचे योग आहेत. अडचणी दूर होतील. पीडा दूर जाईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अत्यंत आनंदाचा दिवस आहे. अर्थलाभ होईल. व्यावसायिक स्थिती भक्कम होईल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्साह आणि आनंदाने भरलेला आणि भारलेला दिवस असणार आहे. स्वप्ने पूर्ण होतील. भय संपेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. तुमचीच बाजू भक्कम असल्याचे सिद्ध होईल. छोटी सहल घडेल. शेअर्स मध्ये नफा वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अत्यंत अनुकुल दिवस आहे. काय करू आणि काय नको असे होईल. नवनवीन संधी चालून येतील.जमीन व्यवहारातून उत्तम लाभ होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) सिद्धहस्त लेखन होईल. प्रसिद्धी मिळेल. सरकारी सन्मान प्राप्त होतील. व्यवसाय वाढेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्या शब्दास वजन प्राप्त होईल. ठराविक दिशेने वाटचाल होईल. भाग्य उजळेल. राजकीय यश मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अजूनही फारशी अनुकूलता नाही. भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. काही चांगल्या घटना घडतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. दळणवळणच्या वस्तूची खरेदी होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!