मुंबई – गेल्या काही आठवड्यांपासून गायब असलेला मान्सून आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. छत्तीसगढ मध्ये निर्माण झालेल्या कमीदाबाच्या क्षेत्रामुळे पुढील तीन ते चार महाराष्ट्रात दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात आज ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचाअंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिक मध्ये ऑरेंज अलर्ट
नाशिकसाठी मात्र ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर लातूर आणि उस्मानाबादसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे, ह्या दोन्ही जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
संपूर्ण विदर्भासाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
३० ऑगस्ट,कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असून,१५° उत्तर वर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. ह्यांचा प्रभाव म्हणून,महाराष्ट्र राज्यासाठी IMD ने खालील प्रमाणे इशारे पुढच्या ३,४दिवसासाठी दिलेले आहेत.काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे,उत्तर कोकणात पण @RMC_Mumbai pic.twitter.com/e8tHRpwd6K
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 30, 2021